शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ...तर दोन थापडा खाशील; ऑक्सीजन सिलेंडर न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 23:24 IST

पटेल यांनी त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्हाला कुणी ऑक्सिजन सिलेंडरपासून वंचित ठेवले आहे?' यावर ती व्यक्ती म्हणाली, हो, त्यांनी नाकारले. अम्हाला केवळ पाच मिनिटांसाठीच एक सिलेंडर मिळाले.

भोपाळ - संपूर्ण देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आज देशभरातील रुग्णालयांत ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, असे असतानाही लोक आप्तांचा जीव वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, जेव्हा एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील केंद्रीय मंत्र्यांसमोर तक्रार केली, तेव्हा त्याला चक्क उघडपणे धमकीच देण्यात आली. विशेष म्हणजे ही धमी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री प्रह्लाद पटेल यांनी दिली आहे. ऑक्सीजनसाठी हाताश झालेल्या या व्यक्तीला त्यांनी चक्क दोन थापडा मारण्याची धमकी दिली आहे. हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

मध्य प्रदेशातील दमोहच्या एका रुग्णालयाबाहेर एका व्यक्तीने मंत्री प्रह्लाद पटेल यांच्याकडे तक्रार केली, की 'अम्ही एवढे हताश आहोत... आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही...' यावर प्रह्लाद पटेल यांनी त्या व्यक्तीला दोन थापडा मारण्याची धमकीच देऊन टाकली. प्रह्लाद पटेल म्हणाले, 'जर असे बोलशील तर दोन खाशील,' हे बोलताना ते संबंधित व्यक्तीकडे पाहून हातवारेही करत होते. प्रहलाद पटेल हे दमोहचे भाजप खासदार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या उद्या बंगालमध्ये होणाऱ्या सर्व सभा रद्द, कोरोनावरील हायलेवल बैठकीत होणार सहभागी

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

पटेल यांनी त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्हाला कुणी ऑक्सिजन सिलेंडरपासून वंचित ठेवले आहे?' यावर ती व्यक्ती म्हणाली, हो, त्यांनी नाकारले. अम्हाला केवळ पाच मिनिटांसाठीच एक सिलेंडर मिळाले. यापेक्षा नकार दिला असता, ते चांगले झाले असते.'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान उद्या हायलेवल बैठक घेणार  -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. ते उद्या बंगालमध्ये निवडणूक प्रचार सभा करण्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीवर बैठक घेणार आहेत. ते शुक्रवारी कोरोनासंदर्भातील एका हायलेवल बैठकीत सहभागी होतील, असे त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितले आहे. मात्र, बंगाल भाजपच्या विनंतीवरून मोदी सायंकाळी 5 वाजता व्हर्च्यूअली सभांना संबोधित करणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी