शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Coronavirus: लॉकडाऊन काळात आंदोलन, काँग्रेस आमदारासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 2:05 PM

आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात हे महाशय चक्क आंदोलन करत होते.  

सतना - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे १५ एप्रिलपासून नेमकं काय होणार, लॉकडाऊनमुळे लादण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार का, लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार की टप्प्याटप्प्यानं निर्बंध मागे घेतले जाणार, असे अनेक प्रश्न सध्या देशवासीयांना पडले आहेत. मात्र, अद्यापही लॉकडाऊनच उल्लंघन प्रकार उघडकीस येत आहेत. आता, चक्क आमदाराकडून लॉकडाऊनच उल्लंघन झाल्याची घटना पुढे आली असून या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात हे महाशय चक्क आंदोलन करत होते.  

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील कोलगवां पोलिसाांनी लॉकडाऊन उल्लंघन प्रकरणी काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाह यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलगवां पोलीस ठाणे क्षेत्रातील नई बस्ती परिसरात रेशन मालाची मागणी करणाऱ्या नागरिकांना एकत्र घेऊन सिद्धार्थ कुशवाह यांनी मंगळवारी आंदोलन केले. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने, राज्यात कलम १४४ लागू असल्याने आमदार कुशवाह यांचे हे कृत्य आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी कुशवाह यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप एकाही अटक करण्यात आली नाही.    

नई बस्ती परिसरात स्वस्त धान्य वाटपाची व्यवस्था कोलमडली होती, नागरिकांना नीटप्रकारे हे धान्य वाटप करण्यात येत नव्हते. त्यामुळे गरीब आणि मजूरवर्ग रस्त्यावर उतरला होता, याची माहिती मिळाल्याने मी घटनास्थळावर पोहोचलो होतो, असे कुशवाह यांनी सांगितले. तसेच, तिथे पोहोचल्यानंतर मी या गरिबांसोबत रस्त्यावर आंदोलन सुरु केले, यावेळी शेकडो नागरिक येथे एकत्र आले होते, असेही  त्यांनी म्हटले. याप्रकरणी, आमदार सिद्धार्थ कुशवाह, पप्पू साहू, राजकुमार विश्वकर्मा यांच्यासह ८ जणांविरुद्ध आयपीसीच्या कलम २६९, २७०, १८८, ३४ च्या आपत्ती व्यवस्थापन ५१ (ख) च्या कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेसMLAआमदार