शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

coronavirus: चाचण्या होताहेत कमी ,कुणी आमचं ऐकूनही घेत नाही; राहुल गांधींसमोर डॉक्टरने सांगितली मन की बात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 12:35 PM

देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज  डॉक्टर दिनानिमित्त या कोरोना योद्ध्यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये कोरोना चाचण्या खूप कमी प्रमाणात केल्या जात आहेतलोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहेखासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. त्यांना सरकारने मदत केली पाहिजे

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे सध्या मोठे संकट उभे राहिलेले आहे. देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज  डॉक्टर दिनानिमित्त या कोरोना योद्ध्यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही त्यानिमित्त काही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टराने राहुल गांधींसमोर एक धक्कादायक अनुभव शेअर केला.

केरळचे रहिवासी असलेले आणि सध्या दिल्लीतील एम्समध्ये रुग्णसेवा करत असलेले डॉ. विपीन म्हणाले की, दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या खूप कमी प्रमाणात केल्या जात आहेत. तसेच लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.  मलासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सध्या मी क्वारेंटीन आहे,. तर माझी पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असून, तिला चाचणीसाठी सुमारे दहा तास वाट पाहावी लागली, अशी व्यथा या डॉक्टराने मांडली.

सध्या भारतात १२ लाख डॉक्टर आहेत. तर ३० लाखांहून अधिक नर्स आहेत. मात्र भारतातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. येथील खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. त्यांना सरकारने मदत केली पाहिजे.

यावेळी कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतही या डॉक्टरांनी  धक्कादायक माहिती समोर आणली, दिल्लीमध्ये आधी दररोज केवळ ७ हजार कोरोना चाचण्या होत होत्या. मात्र जेव्हा चाचण्यांचे प्रमाण वाढले त्यानंतर पॉझिटिव्ह सापडणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले. त्यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटवण्यात आले. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र केवळ दहा हजार बेड्स उपलब्ध आहेत, अशाने कोरोनाविरोधात कसं लढता येईल.  

दिल्लीमध्ये दोन नर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने कोरोनाशी लढताना मृत्यू होणाऱ्या कोरोना योद्ध्यांना एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्याला उ्त्तर देताना राहुल गांधींनी मी याबाबत सरकारला पत्र लिहीन, असे सांगितले.

कुठलीही रणनीती बनवताना डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. मात्र सध्या ते होत नाही आहे. तसेच दुसरी चिंतेची बाब म्हणजे ज्यांना कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार आहेत. त्यांच्यावर उपचार होत नाही आहेत.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ज्या वस्तूसाठी होता चीनवर 'निर्भर', त्याच्याच निर्मितीत भारत बनला 'आत्मनिर्भर', आता करणार निर्यात

हातात घेऊन कृपाण, गलवानमध्ये बारा चिन्यांचे केले शिरकाण; २३ वर्षांच्या जवानाचा महापराक्रम

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरRahul Gandhiराहुल गांधी