चीनविरोधात सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू, या ठिकाणांवरून परिस्थितीवर ठेवलीय नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 01:03 PM2020-06-26T13:03:33+5:302020-06-26T13:42:42+5:30

गरज पडल्यास अमेरिकन सैन्य चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा मुकाबला करण्यास तयार आहे, असा इशारा पॉम्पियो यांनी दिला आहे. मात्र आशिया खंडामध्ये चीनविरोधात सैनिक आघाडी मजबूत करण्यामागे अमेरिकेचे काही सुप्त हेतू आहेत, हेसुद्धा विसरून चालणार नाही.

अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद पुढच्या काही काळात अधिकाधिक गंभीर रूप घेण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी आशिया खंडात अमेरिकन सैन्याची तैनाती वाढवण्याचे संकेत दिले असून, भारत आणि मित्र देशांना चीनपासून असलेला धोका विचारात घेऊन सैनिकांच्या तैनातीची समीक्षा करत असल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले आहे. तसेच गरज पडल्यास अमेरिकन सैन्य चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा मुकाबला करण्यास तयार आहे, असा इशारा पॉम्पियो यांनी दिला आहे. मात्र आशिया खंडामध्ये चीनविरोधात सैनिक आघाडी मजबूत करण्यामागे अमेरिकेचे काही सुप्त हेतू आहेत, हेसुद्धा विसरून चालणार नाही.

अमेरिकेने यापूर्वीच तैवानजवळ तीन न्यूक्लियर एअरक्राफ्ट कॅरियर तैनात केले होते. पैकी दोन तैवान आणि उर्वरित मित्र देशांसोबत युद्धसराव करत आहे. तर तिसरे एअरक्राफ्ट कॅरियर जपानजवळ गस्त घालत आहे.

सध्याच्या काळात अमेरिकेकडे जगातील सर्वात आधुनिक सेना आणि हत्यारे आहेत. ग्लोबल फायर प़ॉवर इंडेक्सनुसार १३७ देशांच्या सूचीमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा विचार केल्यास अमेरिका इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार अमेरिकेचे जगभरात ८०० लष्करी तळ आहेत. त्यामधील १०० तळ आखाती देशांमध्ये आहेत. तिथे सुमारे ६० ते ७० हजार जवान तैनात आहेत.

आशिया खंडातील कुठल्या देशांना आहे चीनपासून धोका - Marathi News | आशिया खंडातील कुठल्या देशांना आहे चीनपासून धोका | Latest international Photos at Lokmat.com

एशिया में किन-किन देशों को चीन से खतरा आशिया खंडात चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे भारताला सर्वाधिक धोका आहे. सध्या लडाखमध्ये निर्माण झालेला वाद त्याचे ताजे उदाहरण म्हणता येईल. त्याशिवाय पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून चीन आणि जपानमध्ये तणाव आहे. तैवानसोबतही चीनचा वाद आहे. तर फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशियासोबतही चीनचा विवाद आहे.

आशियामध्ये तैनात आहेत दोन लाखांहून अधिक अमेरिकी सैनिक - Marathi News | आशियामध्ये तैनात आहेत दोन लाखांहून अधिक अमेरिकी सैनिक | Latest international Photos at Lokmat.com

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स, इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपच्या आकडेवारीनुसार संपूर्ण आशियामध्ये चीनच्या चहुबाजूला दोन लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक तैनात आहेत. तसेच कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सक्षम आहेत.

मालदीवपासून जवळ असलेल्या दिएगो गार्सिया येथे अमेरिका आणि ब्रिटिश नौदलाचा तळ आहे. हे ठिकाण ब्रिटिश साम्राज्य काळापासून ब्रिटनच्या ताब्यात आहे. हिंदी महासागरातील एक महत्त्वपूर्ण ठिकाण असलेल्या या तळावरून हिंदी महासागर आणि चीनच्या हालचालींवर नजर ठेवली जाते.

जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून अमेरिकन सैन्याची उपस्थिती आहे. येथे अमेरिकेच्या नौदल, हवाई दल आणि लष्कराचे दहा तळ आहेत. एका करारानुसार जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारलेली आहे. इथून अमेरिका दक्षिण चीन समुद्रावर नजर ठेवते.

पॅसिफिक महासागरातील गुआम या बेटावर येथे अमेरिकेचा महत्त्वपूर्ण असा लष्करी तळ आहे. इथून अमेरिका चीन आणि उत्तर कोरियाच्या हालचालींवर नजर ठेवते. तसेच त्यांना प्रत्युत्तर देण्याचे आणि नेव्हल ब्लॉकेज लावण्याचे काम करू शकते.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये वाद आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाच्या रक्षणासाठी इथे अमेरिकन फौज तैनात आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार येथे अमेरिकेचे २८ हजार ५०० सैनिका तैनात आहेत.

चीनच्या नजिक असलेल्या फिलिपिन्समध्येही अमेरिकन सैन्याचा तळ आहे. फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो डुटर्टे यांनी अमेरिकेसोबतच्या व्हिजिटिंग फोर्सेस अॅग्रिमेंटला पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. २०१६ मध्ये सत्तेत आल्यानंतर डुटर्टे यांनी चीनसोबत जवळीक निर्माण केली होती. त्यातून अमेरिका आणि फिलिपिन्समध्ये तणाव निर्माण झाला होता.

तैवानमध्ये अमेरिकेचा कुठलाही सैनिकी तळ नाही. मात्र येथे अमेरिकन सैन्य दलाची ये जा सुरू असते. सध्यासुद्धा अमेरिकेच्या विमानवाहू नौका तैवानमध्ये तैनात आहेत. अमेरिका सुरुवातीपासून तैवानच्या स्वातंत्र्याचा पाठिराखा राहिलेला आहे. त्यात चीनसोबतच्या वाढत्या तणावानमुळे अमेरिकेने या या भागात आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे.

११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानविरोधात युद्ध पुकारले होते. तेव्हापासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात आहे. सध्या अमेरिकेचे १४ हजार सैनिक इथे आहेत. तर मित्र देशांचे ८ हजार सैनिक उपस्थित आहेत.

याशिवाय सिंगापूर, एसेसन बेटे आणि कझाकिस्तान येथेही अमेरिकेचे सैन्य तैनात आहे.

आशियामध्ये सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू - Marathi News | आशियामध्ये सैन्य पाठवण्यामागे अमेरिकेचा हा आहे सुप्त हेतू | Latest international Photos at Lokmat.com

जागतिक महाशक्ती म्हणून बिरुद मिरवणाऱ्या अमेरिकेसमोर गेल्या काही काळात चीनने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यातच चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे अमेरिकेच्या मित्र देशांसमोर संकट निर्माण झालेले आहे. तसेच चीनच्या अरेरावीमुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशिल आहे.