Coronavirus: मेंढपाळाला झाली कोरोना व्हायरसची लागण; शेळ्या-मेंढ्यांना क्वारंटाइन केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:48 AM2020-07-01T03:48:24+5:302020-07-01T06:54:43+5:30

टुमकुरू जिल्ह्यात गोलारहट्टी तालुक्यातील गोडीकेरी गावात हा प्रकार झाला आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, या गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता

Coronavirus: Shepherd infected with coronavirus; Quarantined goats and sheep | Coronavirus: मेंढपाळाला झाली कोरोना व्हायरसची लागण; शेळ्या-मेंढ्यांना क्वारंटाइन केलं

Coronavirus: मेंढपाळाला झाली कोरोना व्हायरसची लागण; शेळ्या-मेंढ्यांना क्वारंटाइन केलं

googlenewsNext

बंगळुरू : टुमकुरू जिल्ह्याच्या एका गावातील मेंढपाळाला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्याकडील सर्व शेळ्या व मेंढ्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. सुमारे ५० शेळ्या व मेंढ्यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने त्यांना वेगळे ठेवण्याचा निर्णय पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घेतला. मंत्र्यांंनी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.

टुमकुरू जिल्ह्यात गोलारहट्टी तालुक्यातील गोडीकेरी गावात हा प्रकार झाला आहे. एका अधिकाºयाने सांगितले की, या गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. पण मेंढपाळ पॉझिटिव आढळला आणि मेंढ्या व शेळ्या यांना त्रास होत असल्याचे जाणवले. त्यामुळे गावकरी घाबरून गेले होते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. शेळ्या व मेंढ्या यांना वेगळ्या आजाराची लागण झाली असावी, असे आम्हाला वाटत आहे. आम्ही ते तपासून पाहत आहोत. 

Read in English

Web Title: Coronavirus: Shepherd infected with coronavirus; Quarantined goats and sheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.