शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: २०१६ मध्ये दिला गेला कोरोना लसीचा पहिला डोज; लस घेऊन आलेला तरुण टेन्शनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:33 IST

CoronaVirus News: कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्याचा पराक्रम; लस घेतलेल्या रुग्णाला नाहक मनस्ताप

हाथरस: देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होऊ लागल्यानं दिलासादालक स्थिती आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र काही ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागत आहे. तर कुठे लसीकरणावेळी गोंधळ पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये लसीकरण प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराचा फटका एका तरुणाला बसला आहे.अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तूहाथरसमध्ये राहणारा एक तरुण कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचला. तिथे त्याला काही तास वाट पाहावी लागली. त्यानंतर त्याला पावती मिळाली. थोड्या वेळानं लस टोचण्यात आली. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याला एक कार्ड देण्यात आलं. घरी गेल्यावर त्यानं ते कार्ड वाचलं. कार्डवरील तारीख पाहून त्याला धक्काच बसला. कारण पहिली लस जून २०२१ मध्ये नव्हे, तर सप्टेंबर २०१६ मध्ये दिली गेल्याचा उल्लेख कार्डवर होता.धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं हाथरसमधील सासनी येथे राहणारा प्रशांत कुमार दीक्षित नावाचा तरुण ७ जूनला जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी गेला होता. तिथे बरीच मोठी रांग असल्यानं प्रशांतला काही तास त्याला वाट पाहावी लागली. पावती तयार करणाऱ्या व्यक्तीनं ७ सप्टेंबर २०१६ तारीख लिहिली. त्याकडे फार्मासिस्टनं दुर्लक्ष करून नोंदणी करून लसीचा डोस दिला. ही बाब घरी पोहोचल्यानंतर प्रशांतच्या लक्षात आली. त्यामुळे तो मानसिक त्रास झाला. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासनप्रशांत दीक्षित लस घ्यायला आले तेव्हा बरीच गर्दी होती. कामाचा जास्त ताण असल्यानं कर्मचाऱ्यानं कार्डवर चुकीची तारीख लिहिली असावी, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न सीएचसी सासनीचे डॉ. एस. पी. सिंह यांनी केला. त्या दिवशी ज्यांचं लसीकरण झालं, त्यांना बोलावण्यात येईल आणि तारीख दुरुस्त करून देण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस