VIDEO: अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 12:57 PM2021-06-10T12:57:12+5:302021-06-10T14:24:54+5:30

कोविशील्डची दुसरी लस घेतल्यानंतर शरीराला चिकटू लागल्या लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू; कुटुंबीय, शेजाऱ्यांसह डॉक्टरही हैराण

metal and steel products started sticking to the body of a senior citizen in nashik after he takes second dose of corona vaccine | VIDEO: अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू

VIDEO: अहो आश्चर्यम! लस घेतल्यानंतर नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चिकटू लागल्या लोखंड अन् स्टीलच्या वस्तू

Next

नाशिक- कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे परीणाम दुष्परिणाम या विषयी अनेक चर्चा असतानाच नाशिक शहरातील सिडको भागातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगाला चक्क लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचा अजब प्रकार घडला आहे. सिडकोतील शिवाजी चौकात राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत.



अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी सपत्नीक कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतर २ जून रोजी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता प्रतिपिंड तयार होणार अशी त्यांची भावना असताना भलताच प्रकार पुढे आला आहे. त्यांच्या मुलाने अशाच प्रकारे कोविशील्ड लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या अंगाला लोखंडी साहित्य चिकटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवर काल रात्री बघितले. हे पाहून त्यांनी सहज आपल्या आई वडिलांची चाचणी घेतली. तर आईला असे काही झाले नाही. मात्र वडिलांच्या अंगाला लोखंड आणि स्टीलच्या वस्तू चिकटू लागल्याचे लक्षात आले. 



यानंतर त्यांनी त्यांच्या परिचीत खासगी वैद्यकीय व्यवसायिकांशी संपर्क साधला. त्यांनी देखील हा अजब प्रकार असल्याचे सांगितले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी तेथे भेट दिली. त्यांनी हा चमत्कार नसून विज्ञानाचाच एक भाग असून संबधीत ज्येष्ठ नागरिकाची वैद्यकीय चाचणी करून निराकरण करता येईल असे सांगितले.

Read in English

Web Title: metal and steel products started sticking to the body of a senior citizen in nashik after he takes second dose of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.