शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चहा प्यायला थेट रुग्णालयातून बाहेर पडला कोरोना पॉझिटिव्ह अन् झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:13 IST

अशातच बंगळुरूतील चहाचा शौकीन असलेल्या एका कोरोना रुग्णानं थेट रुग्णालयाच्या बाहेर धाव घेतली.

बंगळुरूः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णालयातही रुग्णांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष असून, त्या कक्षात सामान्य माणूस जाण्याची हिंमत करत नाही. प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती सतावते आहेत. अशातच बंगळुरूतील चहाचा शौकीन असलेल्या एका कोरोना रुग्णानं थेट रुग्णालयाच्या बाहेर धाव घेतली. त्यानंतर आजूबाजूचे लोक चांगलेच घाबरले. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. 

बुधवारी सकाळी ७३ वर्षांची ही वयोवृद्ध व्यक्ती चहा पिण्यासाठी अँब्युलन्समधून थेट रुग्णालयाच्या बाहेर गेली, रुग्णालयाजवळच एक चहाची टपरी आहे. तिथे रुग्णाच्या वेषात आलेल्या त्या वयोवृद्धाला चहा टपरीवाल्यानं विचारलं, तुम्ही कुठून आलात, तेव्हा त्यानं सांगितलं, मी कोरोना पेशंट असून, रुग्णालयानं चहा न दिल्यानं तुझ्याकडे चहा प्यायला आलो. त्याच दरम्यान चहावाल्याकडे आधीच चहा पित असलेल्या ग्राहकांना चहाचे कप ठेवून धूम ठोकली आणि चहावाल्याला चहाचे पैसेसुद्धा त्या ग्राहकांनी दिले नाहीत. चहावाल्यानं याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली असून, त्याला चहाची टपरीच बंद करावी लागली आहे. त्याचं झालं असं की, रविवारी रात्री त्या वयोवृद्धाला थोडा थकवा आणि डायरियाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात भरती करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये आधीच जमा करावे लागले. मंगळवारी जेव्हा त्यांचा रिपोर्ट आला, तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. त्या खासगी रुग्णालयानं १.५ लाखांचं बिल फाडलं होतं. ते बिल भरल्यानंतर त्या रुग्णाला कुटुंबीय सरकारी रुग्णालयात घेऊन गेले. बंगळुरूतील मालेश्वरम रुग्णालयात त्यांना तात्काळ कोणताही बेड उपलब्ध झाला नाही. तीन तास त्यांनी बेडच्या प्रतीक्षेत अँब्युलन्समध्येच काढले. त्यांच्या नाकातून रक्तही वाहत होतं, पण रुग्णालयानं फक्त त्यांना कॉटन दिला. मोठ्या प्रयत्नांती त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा

ZOOMला टक्कर देण्यासाठी अंबानींची जिओ मैदानात; JioMeet अ‍ॅप केलं लाँच

सत्तेत आल्यास भारताला देणार 'ही' मोठी भेट, बायडन यांच्या घोषणेनं ट्रम्पना हादरा

CoronaVirus : लढ्याला यश! भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस 'या' दिवशी येणार बाजारात

जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

आता देशातील १०९ मार्गांवर धावणार १५१ खासगी ट्रेन

कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र 

आजचे राशीभविष्य - 3 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यांतून लाभ होईल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या