Today's horoscope - July 3, 2020; People of this zodiac sign will benefit from social activities | आजचे राशीभविष्य - 3 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यांतून लाभ होईल

आजचे राशीभविष्य - 3 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यांतून लाभ होईल

मेष - आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत.  आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. स्वकीय आणि जवळच्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. आणखी वाचा

कन्या - कोणत्याही कामात विचार न करता भाग घेण्यास श्री गणेश तुम्हाला मना करताहेत. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. आणखी वाचा

तूळ - गणेशजी सांगतात की, आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय नक्की होत नाही असे झाल्याने नवीन कामे सुरू करू नका. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस कष्टप्रद आहे. म्हणून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबियां सोबच मतभेदाचे प्रसंग घडतील. आणखी वाचा

मकर - सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कुंभ - आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा

मीन - मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करण्याची सूचना श्रीगणेश देतात. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - July 3, 2020; People of this zodiac sign will benefit from social activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.