जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:40 AM2020-07-03T10:40:28+5:302020-07-03T10:42:31+5:30

पोलीस कॉन्स्टेबलच्या 125 जागांसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची भरती होईल. या पदांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.

kerala psc police constable sarkari naukri for men and women vacancy govt job | जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

Next

थिरुअनंतपूरम : कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, अनेक देशांनी त्याला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. लॉकडाऊनच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखणं हे पोलिसांसाठीही एक आव्हानच आहे. बऱ्याचदा नागरिक पोलिसांना न जुमानता रस्त्यावर फिरतात किंवा मॉर्निंग वॉकला जातात. त्यामुळे अशांवर पोलिसांना अखेर कारवाई करावी लागते. तसेच गुन्हेगारीही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्या तुलनेत पोलिसांचं संख्याबळ कमी पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केरळ लोकसेवा आयोगाने पुरुष आणि महिला गटातील पोलीस कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती काढली असून, रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जाणार असल्याचं सांगितलं आहे. पोलीस भरतीसाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करता येऊ शकतात. अर्ज करू इच्छिणारे उमेदवारांनी keralapsc.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पोलीस कॉन्स्टेबलच्या 125 जागांसाठी महिला आणि पुरुष उमेदवारांची भरती होईल. या पदांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येतील.

पोलीस कॉन्स्टेबल (पुरुष) 90 पदांची भरती करण्यात येणार आहे, तर पोलिस कॉन्स्टेबल (महिला) 35 पदांची भरती करण्यात येणार असून, एकूण  पदांची संख्या 125 एवढी आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी SSLC पास केलेली असावी. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 31 वर्षे असावे.

20 मे 2020 ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात होणार असून,  ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख 31 जुलै 2020 देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना कोणतीही अर्ज फी जमा करावी लागणार नाही. इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांवर अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा / ओएमआर / ऑनलाइन चाचणी आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22,200-48000 रुपये दिले जातील.

Web Title: kerala psc police constable sarkari naukri for men and women vacancy govt job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.