CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 10:10 AM2020-05-25T10:10:14+5:302020-05-25T10:18:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.

CoronaVirus Marathi News harsvardhan probable 4 vaccines corona testing SSS | CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

Next

नवी दिल्ली - देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सव्वा लाखांहून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर देशभरात 31 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसविरोधात अद्याप प्रभावी असं औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचं ट्रायल कोरोनाविरोधात केलं जातं आहे.

देशात कोरोनाची लस तयार करण्यावरही वैज्ञानिक दिवसरात्र काम करत आहेत. त्यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पाच महिन्यांच्या आत 4 लसींचं क्लिनिकल ट्रायल केलं जाऊ शकतं अशी माहिती दिली आहे.

'संपूर्ण जग कोरोनाची लस शोधण्याचे प्रयत्न करत आहे. 100 पेक्षा अधिक जण यावर काम करत आहेत आणि हे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांचं संयोजन करत आहे. भारतदेखील यावरील लस शोधण्यात सक्रीयरित्या काम करत आहे. भारतात 14 ठिकाणी यावर काम सुरू असून ते विविध टप्प्यात आहे' अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे असं ही ते म्हणाले आहेत. 

हर्षवर्धन यांनी 'माझ्या माहितीप्रमाणे देशातील 14 पैकी ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यांत क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर आहेत. कोणत्याही लसीची अपेक्षा करणं ही घाई ठरू शकते. लस विकसित करणं ही मोठी प्रक्रिया आहे. लस पूर्णपणे विकसित होण्यासाठी वर्ष लागू शकतं. यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात धुत राहणं, स्वच्छता राखणं हे त्यावरील उपाय आहेत' असं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये गावकऱ्यांनी काढली गायीची अंत्ययात्रा अन् नंतर झालं असं काही...

CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्... 

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये मैत्रिणीला लपून-छपून भेटणं भाजपा नेत्याला चांगलंच पडलं महागात

Web Title: CoronaVirus Marathi News harsvardhan probable 4 vaccines corona testing SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.