CoronaVirus Marathi News gautam gambhir attacks kejriwal over lockdown SSS | CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"

CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसपासून बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखांहून अधिक झाली आहे. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन दरम्यान दिल्लीकरांना सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपाचा खासदार गौतम गंभीर आणि विजय गोयल यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. गौतम गंभीरने हे एखाद्या डेथ वॉरंटप्रमाणे ठरू शकतं असं म्हटलं आहे. 'जवळपास संपूर्ण दिल्ली एकत्र सुरू करणं हे दिल्लीकरांसाठी डेट वॉरंटसारखं ठरू शकतं. दिल्ली सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मी विनंती करतो. एक निर्णय चुकीचा ठरला तर सर्वकाही संपेल' असं गंभीरने म्हटलं आहे. 

गौतम गंभीरने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारी याबाबतचे ट्विट केले आहे. तर भाजपाचे खासदार विजय गोयल यांनीही या निर्णयामुळे कदाचित दिल्लीचं वुहान होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली आहे. 'एकीकडे केंद्र सरकार लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील अनेक गोष्टी इतक्या लवकर सुरू करण्याची काय गरज होती? सर्व गोष्टी हळूहळू सुरू केल्या असत्या तर चांगलं झालं असतं. त्यांनी ज्याप्रकारे घोषणा केल्या त्याप्रमाणे दिल्लीचं वुहान होऊ नये अशी भीती आहे' असं गोयल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त् दिले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 48 लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.  गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी 5242 रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ...अन् पंतप्रधान येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलं असं काही; Video व्हायरल

Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत

CoronaVirus : फक्त 12 दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दुप्पट; कोरोनाचा धक्कादायक ग्राफ

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यात ICMRने रणनीतीत केले मोठे बदल; आता 'या' लोकांचीही होणार चाचणी

CoronaVirus News : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?

CoronaVirus News : मस्तच! कोरोनाच्या संकटात 'हा' हटके रिस्टबँड फायदेशीर ठरणार; वेळोवेळी सतर्क करणार

CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News gautam gambhir attacks kejriwal over lockdown SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.