CoronaVirus : X-ray मार्फत कोरोनाचं निदान होणार, फक्त 5 मिनिटांत रिझल्ट मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:37 AM2020-05-19T08:37:17+5:302020-05-19T09:41:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या वेगाने होत असलेल्या संसर्गामुळे जगासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे.

भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे विक्रमी 5242 रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

भारतातील कोविड-19 च्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.

कोरोनाचे निदान करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे.

X-ray मार्फत आता कोरोना व्हायरसचं निदान होऊ शकतं. यामुळे खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमधील ईएसडीएस (ESDS) या आयटी कंपनीने एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. ज्यामुळे फक्त एक्स-रे (X-ray) मार्फत कोरोना व्हायरसं निदान करणं शक्य आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची टेस्ट करायची आहे, त्याच्या छातीचा एक्स-रे काढावा लागेल. या एक्स-रेची डिजिटल प्रिंट या सॉफ्टवेअरमध्ये लोड करावी लागेल.

सबमिट टॅबवर क्लिक केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच त्या व्यक्तीचा रिपोर्ट येईल. ज्यामधून कोरोनाचे निदान करणे हे सोपे होणार आहे.

शास्त्रज्ञांनी प्रायोगिक चाचणीत ही पद्धत यशस्वी ठरल्याचं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाची चाचणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मात्र या पद्धतीने अवघ्या काही मिनिटांच कोरोनाचे निदान करणे शक्य होणार आहे.

भारतात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर 38.39 टक्के आहे. भारतात आतापर्यंत व्यापक उपाययोजना करण्यात आल्याने समाधानकारक परिणाम मिळत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

24 मार्चपासून 31 मेपर्यंतचा 69 दिवसांचा प्रदीर्घ लॉकडाऊन देशभर असून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजना करूनही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.