CoronaVirus News : आशेचा किरण! जगभरात आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरू; WHOची दिलासादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:07 AM2020-05-17T11:07:10+5:302020-05-17T12:09:37+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही.

जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तब्बल 46 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 4,628,724 वर पोहोचली आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय घेतले जात आहेत.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक माहिती दिली आहे.

जगभरात सध्या कोरोनावरील महत्त्वाच्या अशा आठ लसींची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे अशी माहिती WHO ने दिली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने इतर 110 लस संपूर्ण जगभरात विकसित होण्याच्या विविध टप्प्यातून जात असल्याचं देखील म्हटलं आहे.

जगातील सर्व देश एकजूट होऊन या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तयारी करीत आहेत. यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनी या व्हायरसला मूळापासून संपवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीनसहित इतर काही देशांनी लस तयार करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

चीनचे आरोग्य अधिकारी झांग वेनहोंग यांनी 2021 च्या मार्चमध्ये कोरोना व्हायरस संपवण्यासाठी लस तयार झालेली असेल. लस तयार करण्यात सध्या मोठी अनिश्चितता आहे असं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी आजवर कोणतीही चांगली लस निर्माण होऊ शकलेली नाही. उलट एखादी लस यासाठी प्रभावी ठरू शकली तरी ती तयार होण्याची शक्यता पुढील वर्षी मार्च ते जून दरम्यानच असेल असं झांग वेनहोंग यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला लस मिळेल असा दावा केला आहे.

कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 88,507 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

कोरोनामुळे भारतातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे.

देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 90,648 वर गेला आहे.