CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:03 PM2020-05-13T15:03:26+5:302020-05-13T15:23:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 2200 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

CoronaVirus Marathi News doctor claim corona patients cured zinc hot water SSS | CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा

CoronaVirus News : 'झिंक आणि गरम पाण्याने कोरोनाग्रस्त बरे झाले', डॉक्टरचा दावा

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर 2200 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र याच दरम्यान विविध दावे केले जात आहेत. 

झिंक आणि गरम पाण्याने कोरोनापासून बचाव करता येतो असं मंगळुरूतील एका डॉक्टरने म्हटलं आहे. यासोबतच डॉक्टरने आतापर्यंत  झिंक आणि गरम पाण्याने 7 कोरोना रुग्णांवर उपचार केले आणि ते बरे झाले असा दावाही केला आहे. मंगळुरूच्या ए. जे. मेडिकल कॉलेजमधील हेड अँड नेक सर्जरीचे प्राध्यापक डॉ. पी. पी. देवन यांनी हा दावा केला आहे. देशातील सर्व लोकांनी जर आपल्या आहारात झिंकचा समावेश केला तर कोरोना किंवा त्यासारख्या कोणत्याही इन्फेक्शनपासून बचाव करता येऊ शकतो असं देवन यांनी म्हटलं आहे. 

'शरीरात झिंक योग्य प्रमाणात असेल तर व्हायरस शरीरावर काहीच परिणाम करू शकत नाही. शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी टरबूज, पपईच्या बिया, अननस, अक्रोड यांचं सेवन करावं. दोन अक्रोड, डार्क चॉकलेट आणि अननसाचं सेवनही शरीरात झिंकची मात्रा वाढवतो. दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर फळांचं सेवन केल्यानंही शरीरात याची मात्रा वाढते. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक आणि आयर्न टॅबलेट्सही घेऊ शकता' असं डॉक्टर देवन यांनी म्हटलं आहे. 

देवन यांनी घशात खवखव होत असेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तात्काळ गरम पाणी पिणं सुरू करा. यामुळे घाम येईल आणि शरीराचं तापमान एक-दोन डिग्री पर्यंत वाढेल इतकं गरम पाणी प्या. धावल्यानं आणि अंगमेहनतीची कामं केल्यानंही घाम येतो मात्र गरम पाणी प्यायल्यास व्हायरसला रोखता येतं असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुजरातमध्ये कोरोनामुळे 396 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी गुजरात सरकारने मोठा दावा केला होता. 

CoronaVirus News : कोरोनाला रोखणारा आयुर्वेदिक काढा, 6000 लोकांवर चाचणी केल्याचा गुजरात सरकारचा दावा

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयोगी पडत असल्याचा दावा सरकारने केला होता. गुजरातमध्ये राज्यात 3585 लोकांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला. तर 2625 लोकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली. यातील फक्त 11 लोकांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यांना कोरोना झाला कारण त्यांनी डोस पूर्ण केला नाही अशी माहिती जयंती रवि यांनी दिली होती. क्वारंटाईन झालेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेलं 'Y2K' नेमकं आहे तरी काय?

CoronaVirus News : बापरे! ज्याच्या घरात चोरी केली तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मग...

CoronaVirus News : रिक्षातून केला तब्बल 1500 किमीचा प्रवास पण घरजवळ येताच...; मन सुन्न करणारी गोष्ट

CoronaVirus News : "हजारो मुलं-मुली रस्त्यावर... आज भारत माता रडतेय"

CoronaVirus News : मंत्री शिंकले, सगळेच घाबरले अन् पुढे झालं असं काही...

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

 

Web Title: CoronaVirus Marathi News doctor claim corona patients cured zinc hot water SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.