CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:03 PM2020-05-12T13:03:53+5:302020-05-12T13:19:29+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसपसून बचाव करण्यासाठी सतत हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. तसेच आपली आणि कुटुंबीयांची काळजी घ्या, घर स्वच्छ ठेवा असं ही सांगितलं जात आहे.

देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 70 हजारांवर गेला आहे. 2000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्याचं सांगितलं जातं. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

कोरोनाच्या लढ्यात सतत हात धुणं ही सोपी सवय महत्त्वाची ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. हात धुण्यासोबतच स्वच्छतेच्या इतर सवयीही कित्येक संसर्गापासून वाचवतात.

नियमित स्वच्छतेच्या सवयींच्या अवलंब केल्यास संसर्गाचा धोका हा 50 टक्के कमी होतो. तसेच संसर्गावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अँटिबायोटिक्स औषधांची गरजही 30 टक्के कमी होत असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना व्हायरसपसून बचाव करण्यासाठी सतत हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. तसेच आपली आणि कुटुंबीयांची काळजी घ्या, घर स्वच्छ ठेवा असं ही सांगितलं जात आहे.

ब्रिटनच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी याबाबत एक रिसर्च केला आहे. यामध्ये नियमित स्वच्छता अँटिबायोटिक्स औषधं कमी घेण्यात आणि अँटिबायोटिक्स रेजिस्टनचा धोका कमी करण्यात काय भूमिका बजावतं हे सांगण्यात आलं आहे.

ब्रिटनच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ जीन यवेस मिलॉर्ड यांनी सध्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं सांगितलं.

स्वच्छतेमुळे अँटिबायोटिक्सची गरज कमी होईल आणि आजारांविरोधात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यात मदत होईल असं देखील जीन यवेस मिलॉर्ड यांनी म्हटलं आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध करण्यात आलं आहे. स्वच्छतेच्या सवयीमुळे संसर्ग रोखता येऊ शकतो. तसेच अँटिबायोटिक्स औषधांची गरज पडणार नाही असं यामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.