CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 08:37 AM2020-05-13T08:37:33+5:302020-05-13T08:40:50+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका राज्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झा

CoronaVirus Marathi News corona test 50 thousand pregnant women jharkhand SSS | CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

CoronaVirus News : ... म्हणून 50 हजार गर्भवतींची होणार कोरोना टेस्ट; 'या' राज्याने घेतला निर्णय 

Next

रांची - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यातही वाढ झाली असून रुग्णांची संख्या 70,000 वर पोहोचली आहे. तर 2200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका राज्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झारखंडमध्ये 50 हजार गर्भवती महिलांची कोरोना टेस्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मे महिन्यांत ज्या महिलांची प्रसूती होणार आहे त्याची कोरोना टेस्ट ही आधी केली जात आहे. रांचीतील नामकुमपासून ही टेस्ट सुरू करण्यात आली आहे. मे महिन्यात राज्यात 51,933 गरोदर महिलांची प्रसूती होणार आहे. आपत्कालीन परिस्थिती कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी हेमंत सोरेन यांच्या सरकारने ही योजना तयार केली असून गर्भवती महिलांसाठी हा निर्णय  घेतला आहे.  

रांचीतील रिम्स आणि सदर रुग्णालयात बाळांना जन्म दिल्यानंतर काही महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. ज्यामुळे त्यांची प्रसूती करणारे डॉक्टर आणि नर्सना क्वारंटाईन व्हावं लागलं. शिवाय प्रसूती विभागही काही दिवस बंद ठेवावा लागला. यानंतर खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालयांनाही गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून घेतलं नाही. ज्यामुळे काही महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सरकारने रुग्णालय आणि गर्भवती महिलांचा विचार करता प्रसूतीआधी महिलांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.

'राज्यातील सर्व गर्भवती महिलांची सुरक्षित प्रसूती होणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या महिन्यात बाळाला जन्म देणाऱ्या सर्व मातांची प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. राज्यभरात ट्रू नेट मशीन लावण्याचीही योजना आहे, जेणेकरून प्रसूतीवेळी कोणती समस्या उद्भवणार नाही. या योजनेअंतर्गत राज्यभरातील सर्व गर्भवती महिलांची कोविड-19 टेस्ट केली जाई, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत नॉर्मल किंवा सिझेरियन प्रसूतीत कोणती समस्या उद्भवू नये' अशी माहिती आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. 

रांचीतील सिव्हिल सर्जन डॉ. वीबी प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामकुमसह रातू आणि सदर परिसरातही गर्भवती महिलांची कोविड-19 टेस्ट केली जाईल. रांची जिल्ह्यात जवळपास 3,500 गर्भवती महिला आहेत, ज्यांची पुढील 3-7 दिवसांत कोरोना टेस्ट केली जाईल. या योजनेअंतर्गत कोरोना चाचणीसह गर्भवती महिलांची आरोग्याची तपासणी होईल. त्यांच्या मोबाईल नंबरसह आवश्यक असेलल्या सर्व माहितीची नोंद ठेवली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! 'या' शहरात 'कॅश ऑन डिलिव्हरी'वर बंदी

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'ही' सवय फायदेशीर ठरेल; 50 टक्के संसर्गाचा धोका टळेल

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात रेशन कार्डाच्या नियमामध्ये बदल; कोट्यवधी लोकांना होणार फायदा

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

CoronaVirus News : होम क्वारंटाईन कधी संपणार?; आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल

 

Web Title: CoronaVirus Marathi News corona test 50 thousand pregnant women jharkhand SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.