शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

CoronaVirus Live Updates : कोरोनाचं भीषण वास्तव! स्मशानभूमीत जागाच मिळेना; पार्किंगमध्ये 15 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 12:53 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates :

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे. याच दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. 

कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील सीमापुरी स्मशानभूमीत हे धक्कादायक चित्र पाहायला मिळालं आहे. पार्किंगमध्येच आतापर्यंत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत मृतदेह जळत असल्यानं स्मशानभूमीमधील फरशी आणि प्लेटदेखील खराब झाल्या आहेत. 

पूर्व दिल्लीतील पाच स्मशानभूमीपैकी सीमापुरी स्मशानात परिस्थिती सर्वात वाईट आहे. कोविडसाठीचे 12 प्लॅटफॉर्मही कमी पडत असल्याचं चित्र आहे. याच कारणामुळे स्मशानभूमीजवळ असणाऱ्या दिल्ली महानगरपालिकेच्या पार्किंगच्या जागेवर लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्योत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगच्या आधी याठिकाणी लहान मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र पाच वर्षांपूर्वी येथे मुलांवर अंत्यसंस्कार करणं बंद करण्यात आलं होता. 

सतत जळताहेत मृतदेह...; कोरोनामुळे परिस्थिती गंभीर

जागेवर महामंडळचं पार्किंग करायचं होतं, मात्र परिस्थिती लक्षात घेता याजागी आता पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शनिवारी येथे एकूण 43 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, जीटीबी हॉस्पिटलचे 36 मृतदेह, मोहन नगर येथील नरेंद्र मोहन रुग्णालयातील एक, गुप्ता नर्सिंग होममधील एक, लोणी रोड येथील एका मृतदेहाचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. तर दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. 

भयावह! स्मशानभूमीत कमी पडतेय जागा; रहिवाशी कॉलनीत मृतदेहावर अंत्यसंस्कार; घटनेने खळबळ

रहिवासी कॉलनीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची राख आसपास असलेल्या घरांजवळ पसरली.  याप्रकारानंतर प्रशासनही खडबडून जागं झालं असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. लोकांनी मृत्यू झालेला व्यक्ती कोरोनाग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी कोणतेही नियम पाळण्यात आलेले नसल्याचं देखील सांगितलं आहे. ती व्यक्ती खरंच पॉझिटिव्ह होती का याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारत