शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

आश्चर्य! कोरोनाग्रस्त महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 5:58 AM

कोरोनाग्रस्त गर्भवतीची ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेने केलेली भारतातील ही पहिलीच प्रसूती आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झालेल्या, परंतु त्या आजाराची लक्षणे न दिसणाऱ्या एका महिलेने येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) शुक्रवारी सायंकाळी एका सुदृढ बाळाला जन्म दिला. कोरोनाग्रस्त गर्भवतीची ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेने केलेली भारतातील ही पहिलीच प्रसूती आहे. या स्त्रिला आधीची एक मुलगी आहे.

वयाने तिशीच्या आत असलेली ही महिला ‘एम्स’मधीलच शरीरशास्त्र विभागातील एका निवासी डॉक्टरची पत्नी आहे. या डॉक्टरला, त्यांच्या पत्नीला व भावाला कोरोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात निष्पन्न झाले होते.

स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीरजा भाटला यांनी सांगितले की, या महिलेला मुलगा झाला असून दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. बाळाला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत तरी त्याला सतत निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जरा जरी लक्षणे दिसली, तर त्याची चाचणी केली जाईल.या महिलेची प्रसूतीची अदमासे तारीख उलटून गेली होती. कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यापासून तिला ‘एम्स’मध्येच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या महिलेला नियमित आॅपरेशन थिएटरमध्ये न नेता विलगीकरण कक्षातच सर्व सज्जता करून ‘सिझेरियन’ शस्त्रक्रिया केली गेली. विशेष काळजी म्हणून या शस्त्रक्रियेसाठी विविध वैद्यकशाखांच्या तज्ज्ञांसह एकूण १० डॉक्टरांचे विशेष पथक नेमले गेले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpregnant womanगर्भवती महिला