शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

coronavirus: या राज्यात आरोग्यमंत्र्यांनीच घेतला रथयात्रेत सहभाग, सोशल डिस्टंसिगचा उडाला फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 7:24 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करवण्याविषयी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आरोग्य खात्यावर आहे.

चित्रदुर्ग - जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, काही प्रमाणात मिळत असलेल्या सवलतींचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये एका धार्मिक रथयात्रेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात आल्याची तसेच या रथयात्रेत राज्याचे  आरोग्य मंत्रीही सहभागी झाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करवण्याविषयी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आरोग्य खात्यावर आहे. मात्र कर्नाटकमध्ये आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांच्या उपस्थितीतच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे. श्रीरामुलू हे एका रथयात्रेल सहभागी झाले होते. या रथयात्रेसाठी शेडको लोक उपस्थित होते. तसेच तिथे कुणीही मास्क परिधान केला नव्हता. त्याबरोबरच सोशल डिस्टंसिंगचेही पालन केले नव्हते. 

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात कर्नाटकचे मंत्री श्रीरामुलू दिसत आहेत. तसेच लोकांकडून त्यांचा जयजयकार करण्यात येत होता. तसेच काही लोक जेसीबी मशीनवर उभे राहिलेले दिसत आहेत. या रथयात्रेत श्रीरामुलू यांच्यासोबतच भाजपाचेही काही नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होता आहेत. आतापर्यंत कर्नाटकमध्ये ३ हजार ४०८ रुग्ण सापडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकBJPभाजपा