शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या लसी जनतेला वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:45 IST

सरकारांचीही गुंतवणूक; काही कंपन्यांचे ‘ना नफा, ना तोटा’ धोरण

नवी दिल्ली : कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी जनतेला वेगवेगळ्या किमतीला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सिरम इन्स्टिट्यूट कोरोना प्रतिबंधक लसीच्या दहा कोटी डोसचे उत्पादन करणार असून, प्रत्येक डोस २४० रुपयांपेक्षा कमी किमतीला उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मात्र, अन्य कंपन्या बनवत असलेल्या लसींच्या किमती भारत व विदेशात वेगवेगळ्या असतील. काही कंपन्यांना लस विक्रीतून मोठा नफा कमाविण्याची इच्छा नाही. काही देशांत सरकारच कंपन्यांना लस संशोधनासाठी निधी पुरवत आहे.कोरोनावरील प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षी तयार होऊ शकली नाही, तर पुढच्या वर्षी या संशोधनाला नक्की यश येईल, असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटत आहे. जगामध्ये विविध कंपन्या, संस्था कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी प्रयोग करीत आहेत.मात्र, त्या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत काही हजार रुपयांत असण्याची शक्यता आहे. सिरम उत्पादित करणार असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत जगातील या प्रकारच्या इतर लसींच्या किमतींपेक्षा सर्वात कमी असणार आहे.कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी त्या कंपन्यांना अमेरिकी सरकारने निधीही पुरविला आहे. त्या बदल्यात लसीची किंमत कमी राखण्यासाठी अमेरिकी सरकारने विविध कंपन्यांशी याआधीच करार केले आहेत. काही देशांत आर्थिकदृष्ट्याा दुर्बल गटाला ही लस मोफत दिली जाईल.मॉडेर्ना कंपनीच्या लसीची अमेरिकेतील किंमत ३९ डॉलर असू शकते; पण हीच लस अन्य देशांमध्ये स्वस्त किमतीत मिळण्याची दाट शक्यता आहे.अ‍ॅस्ट्राझेनिसा, जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर या कंपन्यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनातून प्रचंड नफा कमावण्याची आम्हाला इच्छा नाही. मात्र, मॉडेर्ना कंपनी लसीला जितका उत्पादन खर्च झाला त्यापेक्षा जास्त किंमत ठेवणार आहे.कोणत्या लसीची किती असेल किंमत?अमेरिकेतील मॉडेर्ना ही कंपनी कोरोना प्रतिबंधक लस विकसित करीत असून, तिच्या प्रत्येक डोसची किंमत ३,७०० ते ४,००० रुपये यांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.फायझर कंपनीच्या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत ३,००० रुपये, तर ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेल्या लसीच्या प्रत्येक डोसची किंमत १,००० रुपयांपेक्षा कमी असेल.निरनिराळ्या देशांत कोरोना प्रतिबंधक लसीच्या किमती वेगवेगळ्याही असू शकतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या