शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine: स्वदेशी लस काेव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; औषध नियंत्रकांकडे माहिती सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 06:23 IST

काेव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात २५८०० जणांवर चाचणी करण्यात आली हाेती.

नवी दिल्ली : भारत बायाेटेकने विकसित केलेली काेव्हॅक्सिन ही स्वदेशी काेराेना प्रतिबंधक लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर दिसून आले आहे.  कंपनीने चाचणीचा अहवाल भारतीय औषध नियंत्रक महासंचालकांकडे लसीच्या मंजुरीसाठी सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काेव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यात २५८०० जणांवर चाचणी करण्यात आली हाेती. त्याचा अहवाल कंपनीने गेल्या आठवड्यात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या प्राथमिक तपासण्यांमध्ये दाेन डाेसनंतर लस ८१ टक्के प्रभावी दिसून आली हाेती. रुग्णालयात दाखल हाेण्याची शक्यता १००%  घटल्याचे आढळून आले हाेते. 

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालानंतर लसीला मंजुरी मिळाल्यास जागतिक आराेग्य संघटनेकडूनही आपात्कालीन वापराच्या यादीत काेव्हॅक्सिनचा समावेश हाेऊ शकताे. अहवाल सादर करण्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांची जागतिक आराेग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाेबत लवकरच बैठक हाेणार आहे. 

आंतरराष्ट्रीय प्रवासातील अडचण हाेईल दूर

जागतिक आराेग्य संघटनेच्या यादीत समावेश झाल्यानंतर लसीच्या निर्यातीस परवानगी मिळेल. तसेच लस घेतलेल्या भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील अडचणीही दूर हाेतील.  लसीला मान्यता नसल्यामुळे ही लस घेतलेल्या भारतीयांना अनेक देशांनी प्रवेश नाकारला हाेता. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा चाचणी अहवाल अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त पिअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालेला नाही. नियंत्रकांकडे अर्ज सादर केल्यानंतरच अहवाल प्रसिद्धीस देण्यात येईल, असे भारत बायोटेकने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारत