शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

"कोविशील्ड" लस असुरक्षित ? चेन्नईतील स्वयंसेवकाच्या पत्नीचा गंभीर आरोप : सिरमने आरोप फेटाळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 17:40 IST

भारतात सिरम मार्फत कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.

पुणे : चेन्नई येथील ४० वर्षीय स्वयंसेवकाच्या  ''कोविशिल्ड'' लसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. लस दिल्यानंतर मेंदू (न्यूरो) लॉजिकल समस्या निर्माण झाल्याची तक्रार करत सिरम इन्स्टिट्यूटसह ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲस्ट्राझेनिका कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. तसेच चाचण्या थांबविण्याची मागणीही केली आहे. सिरमने मात्र हे आरोप फेटाळून लावत स्वयंसेवकाविरुद्ध १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाई मागण्याचा इशारा दिला आहे. 

भारतात सिरम मार्फत कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. याअंतर्गत चेन्नई येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला १ ऑक्टोबर रोजी पहिला डोस देण्यात आला होता. लसीकरणानंतर त्याला मेंदूचा गंभीर आजार झाल्याचा आरोप या व्यक्तीने नोटिसमध्ये केला आहे. लसीच्या डोसामुळेच ही समस्या उद्भवल्याचे वैदयकीय तपासणीमध्ये स्पष्ट झाल्याचा दावा त्यामध्ये करण्यात आला आहे. तसेच लसीच्या चाचण्या, उत्पादन व वितरण थांबविण्याची मागणी ही या व्यक्तीने केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच २ आठवड्यात पाच कोटी देण्यात यावे अशी मागणी देखील स्वयंसेवकाच्या पतीनीने केली आहे. 

दरम्यान , सिरमने हे आरोप फेटाळून लावले आहेत. स्वयंसेवकांची आरोग्य स्थिती व चाचणीचा संबंध नाही. ते चुकीच्या पद्धतीने आपल्यातील समस्यांचा दोष चाचणीला देत आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण चुकीच्या पद्धतीने संस्थेची बदनामी करत आहेत. संस्थेने स्पष्ट केले आहे. -----सिरम कंपनी या व्यक्तीविरोधात ठोकणार १०० कोटींचा दावाया व्यक्तीला होणाऱ्या त्रासाशी कोविशील्ड लसीचा काहीही संबंध नसल्याची त्यांना पूर्वीच सांगण्यात आले आहे.परंतु तरीदेखील याव्यक्तीकडून कंपनीला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे.या व्यक्तीच्या हेतूबाबत आम्हाला शंका उपस्थित होत असून आम्ही त्यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याची माहिती सिरम कंपनीने दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य