शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Vaccine: कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच : ‘सिरम’चे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 17:08 IST

'कोविशिल्ड' ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा धक्कादायक आरोप चेन्नई येथील एका स्वयंसेवकाच्या पत्नीने केला होता.

पुणे : कोविशिल्ड ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी असल्याचा खुलासा संस्थेने केला आहे.  

ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या सिरम इन्स्टिट्युटमार्फत सुरू आहेत. तसेच या लसीचे उत्पादनही सिरमकडून सुरू करण्यात आले आहे. चेन्नई येथील एका ४० वर्षीय स्वयंसेवकाच्या पत्नीने ही लसीमुळे मेंदुविषयक समस्या निर्माण झाल्याचा आरोप करून कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच लसीची चाचणी व उत्पादन थांबविण्यासह पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे. ‘सिरम’ने हे आरोप फेटाळले असून त्याबाबतचा खुलासा मंगळवारी दिला आहे.

‘कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकासोबत घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण लसीमुळे हा प्रकार झालेला नाही. त्यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभुती आहे. चाचणीसाठी सर्व आवश्यक नियम, नैतिक प्रक्रिया आणि नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. ही घटना लसीच्या चाचणीशी संबंधित नसल्याचे संबंधित नियामक संस्थांनी स्पष्ट केले आहे. या घटनेशी संबंधित सर्व माहिती भारतीय औषध महानियंत्रकांनाही दिली आहे. सर्व आवश्यक प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर चाचण्या सुरू ठेवल्या आहेत. लस पुर्णपणे सुरक्षित व रोगप्रतिकारक असल्याचे सिध्द झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर वापरासाठी दिली जाणार नाही, याची खात्री देतो. स्वयंसेवकाचे आरोप कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे असल्याने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे,’ असे सिरमककडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य