शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: मेडिकल कॉलेजमधील बाधितांची संख्या २८१ वर, ९९ कर्मचाऱ्यांनाही संसर्ग, मात्र निर्बंध लागू होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 06:23 IST

Coronavirus in Dharwad Medical Collage : धारवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीनंतर काेराेनाचा संसर्ग पसरू लागला आहे. आता १८२ विद्यार्थ्यांबरोबरच ९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोराेनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बंगळुरू : धारवाडमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात फ्रेशर्स पार्टीनंतर काेराेनाचा संसर्ग पसरू लागला आहे. आता १८२ विद्यार्थ्यांबरोबरच ९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. कोराेनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे धारवाडमध्ये वा राज्यात काेणतेही निर्बंध लागू करण्याचा कर्नाटक सरकारचा विचार नसल्याचे राज्याचे आराेग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. तीन दिवसामध्ये बाधित विद्यार्थी तसेच शिक्षक व अन्य कर्मचारी मिळून २८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्यमंत्री सुधाकर यांनी सांगितले की, सर्व १७८८ विद्यार्थ्यांची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. काही जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. याशिवाय राज्यातील एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत ३४ आणि इतर ठिकाणच्या १२ जणांना संसर्ग झाला आहे, तरीही निर्बंध लावण्याची गरज सध्या वाटत नाही. लग्न व इतर समारंभ घालून दिलेल्या निकषानुसार हाेत आहेत, असे सुधाकर यांनी सांगितले. आठ रुग्णवाहिका सज्ज एसडीएम महाविद्यालयाच्या ५०० मीटरच्या परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय धारवाड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आपात्कालीन परिस्थितीसाठी आठ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व बाधितांना महाविद्यालयातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.  

कोरोनाचे ८,३१८ नवे रुग्ण, ४६५ मृत्यूदेशात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ८,३१८ रुग्ण आढळले तर ४६५ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४,६७,९३३ झाली आहे.

ओमिक्राॅन विषाणू घातक नाही -ब्रिटिश शास्त्रज्ञाचे मत ब्रिटनचे शास्त्रज्ञ प्रा. कॅलम सेम्पल यांनी वेगळे मत मांडताना म्हटले आहे की, ओमिक्रॉन हा फार घातक विषाणू नाही. या विषाणूमुळे झालेला संसर्ग सध्या वापरात असलेल्या लसींनीही आटोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ओमिक्रॉनचा  बागुलबुवा कोणीही उभा करू नये.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक