शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:35 IST

Corona Virus : राजस्थानच्या जोधपूरमधील एका ४ दिवसांच्या नवजात बाळाला आणि जयपूरमधील एका महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमधील एका ४ दिवसांच्या नवजात बाळाला आणि जयपूरमधील एका महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.

राजस्थानमध्ये कोरोनाचे ५८३ रुग्ण आढळले आहेत. ज्यातील काही लोकांनी कोरोनावर मात केली तर काहींवर उपचार सुरू आहेत. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा नवीन सब व्हेरिएंट JN.1 च्या उपस्थितीमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचं मानलं जात आहे आणि त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी सर्व नवीन रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा

वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. रवी प्रकाश शर्मा म्हणाले की, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही. त्यांनी मास्क घालण्याचा, सोशल डिस्टंसिंगचा आणि लक्षणं आढळल्यास त्वरित चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिमसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने अद्याप कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत परंतु सर्व रुग्णालयांना लक्षणं असलेल्या रुग्णांची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

रुग्णालयांना ऑक्सिजन, औषधं आणि इतर आवश्यक उपकरणांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. सवाई मान सिंग (एसएमएस) हॉस्पिटल, जयपूर आणि एम्स जोधपूर सारख्या प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान