शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Petrol Diesel Price: कोरोना लसीची चाहूल; पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आठवडाभरात मोठी वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 07:54 IST

Petrol Diesel Price: ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते.

नवी दिल्ली: कोरोना काळात 15 वर्षांपेक्षा कमी किंमतीवर गेलेले कच्च्या तेलाचे दर आता कोरोना लस येण्याची चाहूल लागताच कमालीचे वाढू लागले आहेत. 2021 मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 40 वरून 45 डॉलरवर पोहोचले आहेत. याचाच परिणाम गेल्या आठवडाभरापासून पहायला मिळाला असून देशातील पेट्रोलडिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. 

2021 च्या सुरुवातालीला कच्च्या तेलाच्या किंमती या 58 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जास्त वाढणार आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या 48 दिवसांपासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून या किंमती सतत वाढू लागल्या आहेत. सरकारी पेट्रोलिअम कंपन्यांनी आज पेट्रोल सहा पैशांनी वाढविले आहे. तर डिझेल 17 पैशांनी वाढले आहे. मुंबईत आज पेट्रोल 88.52 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 77.33 रुपयांवर गेले आहे.  

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सप्टेंबरपासून किंमती वाढविण्याचे बंद करण्यात आले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 20 डॉलरवर आल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी इंधनाच्या दरात 1.19 रुपयांची घट झाली होती. यानंतर 48 दिवसांपर्यंत किंमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. या किंमती गेल्या आठवड्यालपासून पुन्हा वाढू लागल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल 53 पैशांमी महाग झाले आहे. तर डिझेलच्या किंमतीमध्ये 95 पैशांची वाढ झाली आहे. 

काँग्रेसचा विरोधऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे नेते मालकीत सिंग म्हणाले की, कोरोनामुळे सामान्य जनता, वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. निवडणुकीनंतर इंधन दरवाढ करण्याचे कोणतेही वैध कारण नाही. इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो. त्याचा फटका सामान्य व्यक्तीला बसतो. केंद्र सरकारने इंधन दरवाढ थांबवावी. याबाबत पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, रस्ते वाहतूक मंत्रालय यांना पत्र पाठवल आहे.

महाराष्ट्रात 60 दिवसांनी दरवाढप्राप्त आकडेवारीनुसार गुरुवार, १९ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली नाही. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल वाढताच गुरुवारी मध्यरात्रीनंतर कंपन्यांनी इंधनाच्या किमती वाढविल्या. शुक्रवार, २० नोव्हेंबरला पेेट्रोल प्रति लिटर ८८.४५, डिझेल ७७.६७ रुपये विकल्या गेले. पूर्वीच्या आकडेवारीनुसार १९ सप्टेंबरला पेट्रोलचे दर ८८.३७ रुपये होते. तर २१ सप्टेंबरला ८ पैशांची घसरण होऊन ८८.२९ रुपयांवर स्थिरावले. त्यानंतर २० नोव्हेंबरला पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी वाढले आहे.पेट्रोल आणि डिझेल दर तक्ता

तारीख पेट्रोल डिझेल

१९ सप्टें. ८८.३७ ७८.६२

२१ सप्टें. ८८.२९ ७८.३३

२७ सप्टें. ८८.२९ ७७.७२

२८ सप्टें. ८८.२९ ७७.६४

१३ ऑक्टो. ८८.२९ ७७.४४

२० नाेव्हें. ८८.४५ ७७.६७ 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल