शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: कोरोना लसीकरणानंतर 'ही' लक्षणं दिसली, तर अजिबात दुर्लक्ष करू नका; सरकारनं सांगितला मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:48 IST

Corona Vaccination: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. याचा थेट परिणाम भारतातील कोविशील्डवर दिसून येत आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आल्यानं लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आरोग्य कर्मचारी आणि लस घेणाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत....तर पुढच्या दोन आठवड्यात संपुष्टात येईल कोरोनाची दुसरी लाट, तज्ज्ञांचं सकारात्मक विधानकोविशील्डची लस घेतल्यानंतर २० दिवसांच्या आत रक्ताच्या गुठळ्या तर होत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. एखादं गंभीर लक्षणं जाणवल्यास तातडीनं लसीकरण केंद्रात जाण्याची सूचना करण्यात आली आहे. कोणतीही लस घेतल्यानंतर (विशेषत: कोविशील्ड) तीव्र स्वरुपाची डोकेदुखी, छातीत वेदना, शरीराला सूज, उलटीशिवाय पोटात वेदना, श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्यास तातडीनं लसीकरण केंद्राशी संपर्क साधावा, असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे.१० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढा!, स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांची मागणीइंजेक्शन घेतलेला भाग सोडता शरीराच्या इतर कोणत्याही भागावर लाल रंगाचे चट्टे येतात का, याकडे नागरिकांनी लक्ष ठेवावं. तुम्हाला मायग्रेनची समस्या नाही आणि उलटीसोबत किंवा उलटीसह सतत डोकं दुखत असल्यास लसीकरण केंद्रावर जाऊन त्याची माहिती द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. लस घेतल्यानंतर जास्त अशक्तपणा जाणवत असल्यास, शरीराच्या एखाद्या अवयवानं काम करणं बंद केल्यास, कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होत असल्यास, डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्यास, ताण-तणाव येत असल्यास लसीकरण केंद्रावर जावं आणि त्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांना द्यावीत, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या