कोरोनामुळे दिल्लीत दहा दिवसांत १०५९ रुग्ण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 03:23 AM2020-11-24T03:23:45+5:302020-11-24T03:24:08+5:30

वाढताहेत मृत्यूचे आकडे; रुग्णांसाठी आयसीयू खाटा नाहीत

Corona killed 1,059 patients in Delhi in ten days | कोरोनामुळे दिल्लीत दहा दिवसांत १०५९ रुग्ण दगावले

कोरोनामुळे दिल्लीत दहा दिवसांत १०५९ रुग्ण दगावले

Next

 विकास झाडे 

नवी दिल्ली : दिल्लीतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. गेल्या दहा दिवसांत १०५९ रुग्ण दगावले आहेत. दररोज नवीन सात ते नऊ हजार रुग्णांची भर पडत आहे. रुग्णांना आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. दिल्ली सरकार मात्र खाटा रिक्त असल्याच्या वल्गना करीत आहे.
गेल्या दहा दिवसांत ४ लाख ९३ हजार ६७७ रुग्णांची कोविड तपासणी करण्यात आली. याचाच अर्थ दिल्लीत सरासरी दररोज ५० हजार तपासण्या होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील तपासण्या १ लाख २० हजार व्हाव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून १० मोबाईल व्हॅन वस्तीवस्तीमध्ये जात आहेत. ज्या रुग्णांना अधिक त्रास होतो त्यांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. अनेक लोक दिल्ली सरकारला ट्विटरवर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, आयसीयू बेड पाहिजे अशी विनंती करीत आहेत. दिल्ली सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर असलेल्या खाटांची संख्या वाढविली असल्याचा दावा केला असला तरी बेडसाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. दिल्ली सरकार रिक्त खाटांची आकडेवारी रोज जाहीर करते.

दिल्लीत तपासण्या आणि मृत्यू
दिनांक     तपासण्या    मृत्यू
१३ नोव्हेंबर    ५६५५३    ९१ 
१४ नोव्हेंबर    ४९६४५    ९६ 
१५ नोव्हेंबर     २१०९८    ९५ 
१६ नोव्हेंबर      २९८२१    ९९ 
१७ नोव्हेंबर     ४९०३१    ९९ 
१८ नोव्हेंबर    ६२२१२     १३१ 
१९ नोव्हेंबर     ६२४३७    ९८ 
२० नोव्हेंबर    ६२४२५    ११८ 
२१ नोव्हेंबर    ४५५६२    १११ 
२२ नोव्हेंबर     ५४८९३     १२१ 

लग्न समारंभाला फटका! 
लग्नांमध्ये उपस्थितांचा आकडा दोनशेहून ५० करण्यात आला आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात लग्न होणार आहेत.  वधू-वरांकडील प्रत्येकी २५ लोकांना उपस्थित राहता येणार आहे. याचा फटका पत्रिका छापून देणाऱ्यांनाही बसला आहे. लग्नसमारंभात फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागेल, त्यावर प्रशासनाचे लक्ष असणार आहे. 

Web Title: Corona killed 1,059 patients in Delhi in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.