शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 05:49 IST

सिरो सर्वेक्षण; ४० कोटी जनता अजूनही विषाणूपासून असुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात सहा वर्षांवरील वयाच्या ६७.६ टक्के नागरिकांमध्ये कोरोना विषाणूरोधी ॲंटिबॉडीज निर्माण झाल्याचे चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणात आढळल्याची माहिती ‘आयसीएमआर’ने दिली. ४० टक्के जनता अजूनही असुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ‘आयसीएमआर’ने म्हटले.

२१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांत जून व जुलैमध्ये चौथे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण केले. त्यात २८,९७५ नागरिक व ७,२५२ आरोग्य कर्मचारी सहभागी होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात सहभागी झालेल्या ८५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ॲंटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. मात्र, १० टक्के जणांनी अजूनही लस घेतली नसल्याने  काळजी घ्यावी लागेल. धार्मिक, राजकीय व इतर कार्यक्रमांना लोकांनी गर्दी करणे टाळायला हवे, असा सल्ला ‘आयसीएमआर’ने दिला आहे.

बैठकीस विरोधी पक्ष गैरहजर

कोरोना महामारीच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातर्फे बोलाविण्यात आलेल्या बैठकीला कॉंग्रेस, ‘आप’, राजद तसेच डाव्या पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे टाळले. संसदेतील प्रमुख नेत्यांसाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती.

प्राथमिक शाळा सर्वप्रथम उघडा

लहान मुलांमध्ये विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिकार शक्ती चांगली असते. त्यामुळे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झाल्यास प्राथमिक शाळा सर्वप्रथम सुरू करण्याचा विचार करावा, असा सल्ला ‘आयसीएमआर’ने दिला आहे.

केंद्राने कोरोना बळींचे आकडे लपविले नाही

केंद्र सरकारने कोणत्याही राज्यांना मृत्यूचे आकडे किंवा रुग्णसंख्या कमी दाखविण्याच्या सूचना केलेल्या नव्हत्या, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. यावरील चर्चेला दिलेल्या उत्तरात ते म्हणाले, की राज्य सरकारकडून मि‌ळणारी आकडेवारी केंद्राकडून एकत्र करुन प्रसिद्ध केली जाते. केंद्राने कुठलेही आकडे लपिवलेले नाहीत. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असेही आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार