शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचा आक्षेप

By admin | Updated: May 24, 2014 03:14 IST

नरेंद्र मोदी यांनी ‘कॅग’बाबत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘कॅग’च्या अहवालाचा राजकीय वापर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे, असे वक्तव्य मोदींनी केले होते.

शीलेश शर्मा, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी ‘कॅग’बाबत केलेल्या टिप्पणीवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘कॅग’च्या अहवालाचा राजकीय वापर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे, असे वक्तव्य मोदींनी केले होते. मोदींचे ‘कॅग’बाबतचे विधान हे भाजपाच्या दुटप्पीपणाचे निदर्शक आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद म्हणाले, ‘कॅग’च्या अहवालाचा मुद्दा बनवून पाच वर्षे संसदेत गदारोळ करीत राहिलेली आणि शेवटच्या अधिवेशनापर्यंत संसदेचे कामकाज बंद पाडणारी भाजपा आता आपली वेळ आल्यावर मात्र, ‘कॅग’च्या अहवालाचा राजकारणासाठी वापर केला जाऊ नये, असे प्रवचन देत आहे. गुजरात सरकारच्या कामकाजावर ‘कॅग’ने जे काही भाष्य केलेले आहे, त्यामुळे गुजरात सरकार आरोपीच्या पिंजर्‍यात उभे होईल की काय, या भयाने भाजपाला पछाडले आहे. ‘कॅग’ अहवालावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्ष दबाव आणणार, असेही अहमद म्हणाले. संसदेत बळकट विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी काँग्रेसने कंबर कसलेली आहे. यातील दुटप्पीपणा जनतेसमोर उघड करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. संसदेत संख्याबळ कमी आहे आणि भाजपाशी दोन हात करण्याची आपली तयारी नाही, असा कोणताही संदेश जाऊ नये, याची काँग्रेस काळजी घेताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी आयोजित काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नेमक्या याच अजेंड्यावर काम करणार आहेत. पक्षाच्या खासदारांनी लढवय्ये बनून भाजपाविरुद्ध आघाडी उघडण्याचे आवाहनही त्या करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.