कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही

By Admin | Updated: August 21, 2014 01:57 IST2014-08-21T01:57:10+5:302014-08-21T01:57:10+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बुधवारी जागावाटपाबाबत सहमती होऊ शकली नाही.

Congress-NCP is still not in agreement | कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बुधवारी जागावाटपाबाबत सहमती होऊ शकली नाही. येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही पक्ष पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. 
आजच्या चर्चेमध्ये कॉंग्रेसकडून माजी संरक्षणमंत्री ए. के. अॅंटोनी व अहमद पटेल तर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सहभागी झाले होते. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी किमान 135 जागा लढविण्याची तयारी दर्शविली असली तरी कॉंग्रेस मात्र 12क् पेक्षा अधिक जागा तयार नाही. याबाबत सहमती न झाल्याने पुढील 2-3 दिवसांत पुन्हा चर्चा करण्याचे या नेत्यांनी ठरवले. त्यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी काही निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
आजच्या बैठकीत काही जागांची अदलाबदल करण्याचा मुद्दाही चर्चेला आला. दोन्ही पक्षांचे विद्यमान आमदार असलेल्या काही जागांची अदलाबदल करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली, असे समजते. पण निर्णय झाला नाही. 

 

Web Title: Congress-NCP is still not in agreement