शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशः निकाहच्या मिरवणुकीत मंदिरासमोर डीजे, दोन गटांत दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:37 IST

Communal Violence In Madhya Pradesh : येथील जाकीर मेव यांच्या मुलाचे लग्न गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये झाले होते. त्याच्या लग्नाची मिरवणूक आता काढण्यात आली होती. याच मिरवणुकी दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम येथे आता दोन गटांत जबरदस्त वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. एका मंदिरासमोर डीजे वाजविल्यामुळे हा वाद निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूंनी तुंबळ दगडफेकही झाली. यानंतर पोलीस तत्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

ही घटना ताल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटडी गावात घडल्याचे बोलले जात आहे. या भागातून निकाहची मिरवणूक काढली जात होती. एका गटाने आरोप केला आहे, की या मिरवणुकीदरम्यान मंदिरासमोर डीजेवर अश्लील गाणे वाजवले जात होते. यावरूनच हा संपूर्ण वाद निर्माण झाला. पाहता पाहता हा वाद एवढा वाढला, की दोन्ही गट समोरासमोर आले.

यानंतर दोन्ही बाजूंनी जबरदस्त दगडफेक झाली. यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच, संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमूख नागेश यादव पोलिसांचे पथक घेऊन गावात पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जवळपासच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या दगडफेकीत 4 जण जखमी झाले आहेत. तर 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना ताल आणि आलोट येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यांपैकी एकाला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. 

येथील जाकीर मेव यांच्या मुलाचे लग्न गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये झाले होते. त्याच्या लग्नाची मिरवणूक आता काढण्यात आली होती. याच मिरवणुकी दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस