पाकिस्तानमधून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुन्हा हुडहुडी; गारठा वाढला, मात्र काही तासांसाठीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 06:37 IST2026-01-20T06:35:57+5:302026-01-20T06:37:15+5:30

सोमवारी अनेक ठिकाणी एकांकी किमान तापमान हाेते.

Cold wave from Pakistan brings chills again Temperatures rise but only for a few hours | पाकिस्तानमधून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुन्हा हुडहुडी; गारठा वाढला, मात्र काही तासांसाठीच

पाकिस्तानमधून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुन्हा हुडहुडी; गारठा वाढला, मात्र काही तासांसाठीच

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पाकिस्तानसह लगतच्या देशाकडून भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे उत्तर भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी पडली आहे. पुढील २४ तास या गारव्याचा प्रभाव कायम राहणार असून, त्यानंतर मात्र तापमानात वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच मुंबईचा पारा बऱ्यापैकी वाढला होता. या काळात कमाल तापमान ३४ हाेते.

किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

मुंबई १५.९, ठाणे १८.८, डहाणू १५.३, नाशिक ११.४,  महाबळेश्वर १३.१, पुणे १२.७, अहिल्यानगर १४.६, बीड १५, नंदुरबार १३.५, माथेरान १२.२, जालना १५.४, बारामती १३.४, जेऊर १३.५, जळगाव ११.८

सोमवारी अनेक ठिकाणी एकांकी किमान तापमान हाेते. तीन दिवसांनी तापमानात हलकी वाढ होईल. २३ आणि २४ जानेवारीला तापमान कमी राहील.
-कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

उत्तर-पश्चिमेकडील वाऱ्यामुळे उत्तरेसह मुंबई व महाराष्ट्राच्या किमान तापमानात घसरण झाली. मुंबई १५ अंश तापमान नोंदविण्यात आले असून, मंगळवारही गारवा कायम राहील.
-अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

Web Title : पाकिस्तान से आई शीतलहर से महाराष्ट्र में फिर ठंडक

Web Summary : पाकिस्तान से आ रही ठंडी हवाओं ने मुंबई और महाराष्ट्र में तापमान गिरा दिया है। अगले 24 घंटों तक ठंड बनी रहेगी, फिर तापमान बढ़ेगा। मुंबई में 15 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। तीन दिन बाद तापमान में हल्की वृद्धि की उम्मीद है।

Web Title : Cold Wave Returns from Pakistan, Briefly Chills Maharashtra

Web Summary : Cold winds from Pakistan have dropped temperatures in Mumbai and Maharashtra. The chill will persist for 24 hours before temperatures rise. Mumbai recorded 15°C. A slight temperature increase is expected after three days.