शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीएनएक्स

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

१. सातासमुद्रापलिकडील रक्षाबंधनदादा राखी बांधायला कधी येशील? किती वाजता भेटायचं ? बहीणीचा प्रश्न, अगं तु घरच्या गडबडीत असलीस तर मीच येतो. अशी भावाची अगदी समजूतदार प्रतिक्रिया.असा संवाद राखीपौर्णिमा जवळ आली की अगदी सहज व्हायचा पण काळाच्या ओघात या संवादाचे स्वरुप बदलले. स्काइपवर कधी भेटूया? तुझी कामं झाली की ...




१. सातासमुद्रापलिकडील रक्षाबंधन

दादा राखी बांधायला कधी येशील?
किती वाजता भेटायचं ? बहीणीचा प्रश्न,
अगं तु घरच्या गडबडीत असलीस तर मीच येतो. अशी भावाची अगदी समजूतदार प्रतिक्रिया.

असा संवाद राखीपौर्णिमा जवळ आली की अगदी सहज व्हायचा पण काळाच्या ओघात या संवादाचे स्वरुप बदलले.

स्काइपवर कधी भेटूया?
तुझी कामं झाली की कळव,
आमची रात्र असेल तेव्हा फोन कर म्हणजे आपण निवांत बोलू शकू, बहीण
तुला गिफ्ट काय हवे त्याची लिंक पाठव. लगेच बुक करतो आणि पाठवून देतो.

असे संवाद आता सर्रास कानावर येऊ लागले.

राखीपौर्णिमा म्हटले की भाऊरायाच्या हातावर कोणती शोभून दिसेल अशा राखीची खरेदी आणि भाऊरायाने बहीणीला काय भेटवस्तू द्यायची याची तयारी हे चित्र ठरलेले. पण आता हे चित्र बदलत असून भारतातील परदेशी असणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढली. मग पूर्वी राखीपौर्णिमेला बहीणीच्या घरी जेवायला जाणारा भाऊ आता इंटरनेटच्या माध्यमातून बहीणीशी संवाद साधायला लागला. यातही सोशल नेटवर्कींग साइटसवरुन भावाला पाठवली जाणारी राखीची चित्रे, राखीपौर्णिमेचा संदेश आणि विविध कल्पक व्हीडिओ यांचे प्रमाण वाढले आहे.
परदेशी असणार्‍या भावाला किंवा बहीणीला भेटणे शक्य नसल्याने मग या दिवशी त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी व्हॉइस कॉल किंवा व्हीडिओ चॅटचा पर्याय अनेकांकडून निवडला जातो. त्यामुळे भावाला ओवाळत त्याच्या हातून भेटवस्तू घेण्याची मजा काही प्रमाणात कमी झालेली दिसते. मग हाच दादा आपल्या बहीणीला परदेशातून येताना भेटवस्तू आणतोच की पण राखीपौर्णिमेला मिळणार्‍या भेटवस्तूची मजा त्यात नसते.



२. सणांचाही झाला इव्हेंट

दिवसेंदिवस सणवारांनाही इव्हेंटचे रुप यायला लागले आणि भावनांपेक्षा त्यातील भौतिक गोष्टींचेच महत्त्व जास्त वाढले. सोन्याचांदीच्या राख्या, भाऊ आणि बहीणीला देण्यासाठी घेण्यात येणार्‍या भेटवस्तू, ऑनलाईन खरेदी यांचे प्रस्थ वाढले. मग त्यामागील बहीणीचे रक्षण करण्याची भावाची भूमिका काही प्रमाणात मागे पडली का? यासाठी विविध वस्तूंची सजलेली दुकाने बहीणींना खूणावू लागली. मग आपल्या भावाकडून काय घ्यायचे याचे बहीणींचा प्लॅनिंग राखीपौर्णिमा जवळ आली की सुरु होते. यात अगदी मोबाईल, घड्याळ यांपासून दागिने कपडे अशा अनेक वस्तूंचा समावेश असतो. यादरम्यान बाजारातही वेगवेगळ्या ऑफर्स देऊन आपल्या ब्रँडकडे किंवा दुकानाकडे आकर्षित करण्याचे अनेक फंडे अवलंबले जातात. मग राखीपौर्णिमेमध्ये कृत्रिमपणा आला आहे का आणि दिखाऊपणा म्हणून हा सण साजरा केला जात आहे का असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहात नाही.