शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चीन आक्रमक पवित्र्यात! लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 21:54 IST

लडाखजवळील विमानतळावर मोठ्या प्रमाणात बांधकाम; दुसरी धावपट्टी तयार केली जात असल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून समोर

नवी दिल्ली: लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना चीननं पँगाँग लेक परिसरापासून २०० किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू केल्या आहेत. या भागात असलेल्या विमानतळावर चीनकडून बांधकाम सुरू असल्याचं दृश्य सॅटलाईटमधून घेण्यात आलेल्या फोटोंच्या माध्यमातून समोर आलं आहे. लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं. त्यावेळी वाद झाल्यानंतर दोन्ही देशांनी या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला.डेट्रेस्फानं (detresfa_) तिबेटमधल्या नगरी गुन्सा विमानतळाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. यातील पहिला फोटो ६ एप्रिल २०२० रोजी काढण्यात आलेला आहे. तर दुसरा फोटो २१ मे रोजी टिपण्यात आला आहे. या दीड महिन्यांच्या कालावधीत चीननं मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं दिसत आहे. नगरी गुन्सा विमानतळावर गेल्या महिन्यात एकच धावपट्टी होती. आता या भागात दुसऱ्या धावपट्टीचं काम अतिशय वेगानं सुरू असल्याचं दिसत आहे. लढाऊ विमानांसाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे. 'एनडीटीव्ही'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

तिसऱ्या फोटोमध्ये तयार धावपट्टीच्या शेजारील भागात असलेली लढाऊ विमानं अगदी स्पष्टपणे दिसत आहेत. चिनी हवाई दलाची चार लढाऊ विमानं विमानतळावर तैनात ठेवण्यात आली आहेत. ही विमानं जे-११ किंवा जे-१६ असू शकतात, असा अंदाज आहे. जे-११/जे-१७ ची बनावट रशियाच्या सुखोई २७ सारखी आहे. भारतीय हवाई दलाचा विचार केल्यास जे-११/जे-१७ ची तुलना सुखोई ३० एमकेआय विमानांसोबत होऊ शकते.
डिसेंबर २०१९ मध्ये ही विमानं पहिल्यांदा विमानतळावर तैनात दिसली होती. आता त्यांचा जवळून काढलेला फोटो समोर आला आहे. त्यामधून ती जे-११/जे-१७ असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नगरी गुन्सा हवाई तळाचं भौगोलिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या विमानतळाचा वापर सैनिकी कारवायांसोबतच नागरी उड्डाणासाठीही केला जातो. हा विमानतळ समुद्रसपाटीपासून तब्बल १४ हजार २२ फुटांवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ अशी त्याची ओळख आहे. 

ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनातपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत

टॅग्स :chinaचीनladakhलडाख