शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील सर्वच प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री : एकही फाईल प्रलंबित नाही

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नागपूर : सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)देण्यात आले आहेत,या संदर्भातील एकही फाईल राज्य शासनाकडे प्रलंबित नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर : सिंचन घोटाळ्यातील विदर्भ, कोकणसह राज्यातील इतरही सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश यापूर्वीच एसीबीला(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)देण्यात आले आहेत,या संदर्भातील एकही फाईल राज्य शासनाकडे प्रलंबित नाही,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रविवारी येथील धरमपेठ वाणिज्य महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळ्याची चौकशी करताना फक्त कोकणातीलच प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीतून विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या प्रकल्पांना वगळले, अशी चर्चा आहे. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही चर्चा निराधार आहे. सिंचन घोटाळ्याशी संबंधित एसीबीने आतापर्यंत ज्या ज्या परवानग्या शासनाकडे मागितल्या आहेत त्या सर्व प्रकरणांच्या चौकशींचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यात कोकणासह विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या प्रकल्पांसह राज्यातील सर्व प्रकल्पांचा समावेश आहे. या संदर्भातील एकही फाईल आमच्याकडे प्रलंबित नाही. क्रिकेट सामन्यात भारत विजयी झाल्यानंतर मुंबईत रात्री जल्लोष साजरा करण्यासाठी अद्याप परवानगी मागण्यात आली नाही. तशी मागणी झाल्यास परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वाईन फ्लू
राज्यात स्वाईन फ्लूची साथ वाढत असल्याने पर्यटनावर परिणाम होणार का, असा सवाल फडणवीस यांना केला असता ते म्हणाले, सध्या राज्यात स्वाईन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. यावर सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, राज्य सरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. स्वाईन फ्लूचा फैलाव वाढत असल्याने राज्यातील पर्यटनावर परिणाम होणार नाही, कारण शासन याबाबत दक्ष आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)