शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुख्यमंत्री विजयन हे केंद्र सरकारचे केरळमधील सिक्रेट एजंट’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:18 IST

K C Venugopal News: काँग्रेसचे सरचिटणीस आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पिनराई विजय हे केंद्र सरकारचे सिक्रेट एजंट आहेत, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला आहे. केरळ सरकारमधील राज्यमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी अलप्पुझा येथील खासदार असलेल्या वेणुगोपाल यांचा उल्लेख काँग्रेसला नष्ट करण्यासाठी भाजपाने पेरलेला सिक्रेट एजंट असा केला होता. त्यानंतर केरळमधील सत्ताधारी असलेल्या माकपावर पलटवार करताना वेणुगोपाल यांनी ही टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, पिनराई विजयन हे केरळमधील केंद्र सरकारचे सिक्रेट एजंट आहेत. तसेच राज्यातील प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. केरळमधील विद्यमान सरकार मागच्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार लागू करण्यासाठी मेहनत घेत आहे. पीएम श्री योजना आणि केंद्र सरकारने आणलेल्या नव्या श्रम संहितेवेळी आपण हे पाहिले आहे. केंद्र सरकारने श्रम संहिता लागू करण्यापूर्वी येथील सरकारने या संदर्भातील मसुदा नियम तयार केले होते, असा आरोपही वेणुगोपाल यांनी केला.

के.सी. वेणुगोपाल पुढे म्हणाले की, कम्युनिष्ट पक्ष हा मजुरांचा पक्ष असल्याचा दावा करतो. मग भाकपाचे राज्य सचिव बिनॉय विश्वम नवा श्रम कायदा आणि मसुदा नियमांच्या मुद्द्यावर गप्प का आहे? त्यांना मजुरांची चिंता नाही आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala CM Vijayan is Modi's secret agent, alleges Congress leader.

Web Summary : Congress leader K.C. Venugopal accuses Kerala CM Pinarayi Vijayan of being a secret agent for the central government, implementing Modi's policies. Venugopal questions the CPI's silence on labor laws, highlighting concerns about worker welfare and accusing Vijayan's government of prioritizing central directives.
टॅग्स :Keralaकेरळcongressकाँग्रेसCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)