शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिराबाहेर गोंधळ; आत घुसण्याचा प्रयत्न,'बुलडोजर बाबा की जय' घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 00:21 IST2026-01-25T00:20:42+5:302026-01-25T00:21:32+5:30
प्रयागराजमध्ये माघ यात्रेत असलेल्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिबिरात घुसण्याचा प्रयत्न झाला. जमावाने गोंधळ घालत बुलडोजर बाबाच्या घोषणा दिल्या.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिराबाहेर गोंधळ; आत घुसण्याचा प्रयत्न,'बुलडोजर बाबा की जय' घोषणा
उत्तर प्रदेशातीलप्रयागराजमध्ये माघ मेळा सुरू असून, सेक्टर ४, त्रिवेणी मार्गावरील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शिबिरात जमावाने घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाने गोंधळ घातला. शनिवारी रात्री समाजकंटकांकडून प्रकार करण्यात आला. काही लोक लाठ्या काठ्या घेऊन शिबिरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना रोखण्यात आले. त्यावेळी बुलडोजर बाबा की जय म्हणत त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या.
सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. शिबिरात असलेल्या सेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवत लाठ्या घेऊन शिबिरात घुसलेल्या जमावाला रोखले. त्यानंतर त्यांना बाहेर काढले. त्यामुळे पुढील घटना टळली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की, मारहाण सुरू झाली असती.
यूपी | प्रयागराज माघ मेले में आज कुछ लड़के हाथ में भगवा झंडे लेकर स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराज के आश्रम पर पहुंच गए। उन्होंने "आई लव बुलडोजर बाबा" के नारे लगाए।
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 24, 2026
अविमुक्तेश्वरानंद पहले ही कह चुके हैं कि सरकार कुछ असामाजिक तत्वों को भेजकर माहौल खराब करना चाहती है। pic.twitter.com/2iEodtw31p
शिबिरामध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे भाविकांच्या मध्ये असतात. मोठ्या संख्येने शिबिरात भाविक उपस्थित असतात. अशावेळी शिबिरात जमाव घुसला असताना आणि मारहाण सुरू झाली असती, तर भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असता.
शिबीर व्यवस्थापनाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही समाजकंटकांच्या विरोधात तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर शिबिराच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
जर पुन्हा अशा प्रकारची घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी यात्रा प्रशासन, पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही दिला गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी या क्षेत्रात पोलीस बंदोबस्त आणखी वाढवला.