शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान

By admin | Updated: June 16, 2014 04:00 IST

शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत कोठेच नाही. जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे

पुणे : शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर भारत कोठेच नाही. जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या जागतिक स्पर्धेत स्थान निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे आणि ते आयसरसारख्या संस्था पेलतील, याचा मला विश्वास आहे, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले.भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयसर) पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बोर्ड आॅफ गव्हर्नरचे अध्यक्ष टी.व्ही. रामकृष्णन, आयसरचे संचालक के.एन. गणेश, कुलसचिव जी. राजशेखर व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते आकाश गुरू या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.राष्ट्रपती म्हणाले, मानवाच्या जीवनात विज्ञान महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे ज्ञानावर आधारित समाज निर्माण होत आहे. यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनावर भर देणारी शिक्षणपद्धती विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. हे ध्येय बाळगून आयसर ‘सायन्स आऊटरिच प्रोग्राम’ राबवत आहे, ज्याच्या माध्यमातून संस्थेबाहेर शाळांमध्ये, वस्त्यांमध्ये आयसरचे विद्यार्थी मूलभूत विज्ञान पोहोचवत आहेत. भारताला शिक्षण आणि संशोधनाची प्राचीन परंपरा आहे. तक्षशिला, नालंदा ही विद्यापीठे जागतिक स्तरावर प्रसिद्ध होती. त्यामुळे उच्च शिक्षणात भारत दीड हजार वर्षे अव्वल होते. पण ही परंपरा खंडित झाली. पुन्हा हा गौरव प्राप्त करण्यासाठी विज्ञानाच्या मूलभूत शाखांचा विकास व्हायला हवा, असे मत मुखर्जी यांनी व्यक्त केले.इराणी म्हणाल्या, आपली अर्थव्यवस्था सेवा उद्योगावर आधारित आहे. ती ज्ञानावर आधारित करायची असल्यास उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज आहे. याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता असून, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, आपल्याकडील नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहे. त्यावर भविष्यात आपला विकास होणार नाही. त्यामुळे गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ आणि नवकल्पनांच्या जोरावरच आपण विकास साधू शकतो. त्यासाठी आयसरसारख्या संस्थांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)