शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

औषध उत्पादनातील स्वयंपूर्णतेसाठी केंद्राने लागू केली पीएलआय योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:25 IST

लस तुटवड्यामुळे आली जाग; अर्ज करण्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : औषध उत्पादनाच्या क्षेत्रात देशाने स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने कामगिरीवर आधारित लाभ (परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेन्टिव्ह-पीएलआय) ही योजना या क्षेत्राला लागू केली आहे. जगातील औषधनिर्मितीचे महत्त्वाचे केंद्र अशी ओळख असलेल्या भारतातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजारावरील लसी व औषधांची मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

१५ हजार कोटी रुपयांची ही योजना असून, ती २ जूनपासून लागू झाली. तिचा लाभ घेण्याकरिता पात्र असलेले औषध उत्पादक ३१ जुलैपर्यंत केंद्र सरकारकडे अर्ज करू शकतात. जेनेरिक औषधांचे जगातील सर्वाधिक उत्पादन भारतात होते. २०१९-२० हे आधारभूत वर्ष मानून पुढील पाच वर्षांमध्ये औषधांची विक्री वाढविणाऱ्या कंपन्यांना पीएलआय योजनेद्वारे ४ ते १० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. 

या कंपन्यांनी औषधांची किती विक्री करायला हवी याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाईल. या कंपन्यांचे २०१९-२० या कालावधीत जागतिक स्तरावर जे उत्पन्न असेल त्यानुसार तीन गटांत त्यांची विभागणी करण्यात येणार आहे. पीएलआय योजनेनुसार या कंपन्यांच्या अर्जांची छाननी करून मग त्यांना किती प्रोत्साहनपर रक्कम द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. लहान व मध्यम गटातील औषध कंपन्यांसाठी ही योजना खूप उपयोगी ठरणार आहे. पहिल्या, दुसऱ्या गटातील कंपन्यांना १० टक्के व तिसऱ्या गटातील कंपनीला ५ टक्के प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

आधारभूत वर्ष बदलण्याची मागणी२०१९-२० या कालावधीत औषध निर्मितीसाठी जो कच्चा माल लागतो त्याचा चीनकडून भारताला होणारा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे काही औषध कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे पीएलआय योजनेसाठी २०१९-२०च्या ऐवजी २०२०-२१ हे आधारभूत वर्ष मानण्यात यावे, अशी सूचना औषध उत्पादक कंपन्यांनी केली आहे. पीएलआय योजनेचा फायदा घेण्यासाठी देशातील औषध कंपन्या योग्य तयारी करत असल्याचे ऑल इंडिया ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश दोशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :medicineऔषधं