कायद्याचे भान ठेवून उत्सव साजरा करा

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:32+5:302015-08-31T21:30:32+5:30

Celebrate the celebrations by keeping the law in mind | कायद्याचे भान ठेवून उत्सव साजरा करा

कायद्याचे भान ठेवून उत्सव साजरा करा

>पुणे : गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; परंंतु कायद्याचे भानही ठेवा. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करुन सार्वजनिक हिताला बाधा पोचणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद यांनी केले.
पुणे पोलिसांच्या विघ्नहर्ता न्यासाच्यावतीने उत्कृष्ट सजावट व शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुका काढणा-या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामानंद बोलत होते. पुण्याच्या गणेशोत्सव देशभरात नावाजलेला आहे. लहानपणी कोल्हापुरहून पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी खास पुण्यात यायचो. त्यावेळी रात्रभर स्पिकर सुरु असायचे. मात्र गेल्या काही वर्षात लागू झालेल्या नवि कायद्यांमुळे स्पिकर आणि रस्त्यांवरच्या मांडवांसदर्भात निकष लागू झाले आहेत. कायद्यांमधील बदलाची माहिती कार्यकर्त्यांना असणे आवश्यक आहे. पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी रामानंद यांनी केले.
विज्ञानविषयक देखावा सादर करणारे शनिवार पेठेतील जयहिंद मित्र मंडळ सर्वोत्कृष्ट मंडळ पुरस्काराचेे मानकरी ठरले. न्यासाचा करंडक जयहिंद मित्र मंडळास प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वस्त राजीव साबडे, डॉ. मिलिंद भोई, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सारंग आवाड, बसवराज तेली, आदी उपस्थित होते.

Web Title: Celebrate the celebrations by keeping the law in mind