शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांवरील रोख व्यवहारबंदी बासनात

By admin | Updated: September 18, 2016 04:05 IST

३ लाखांवरील रोख रकमेच्या व्यवहारांवर बंदी घालण्याची केंद्र सरकारची योजना बारगळली आहे.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- ३ लाखांवरील रोख रकमेच्या व्यवहारांवर बंदी घालण्याची केंद्र सरकारची योजना बारगळली आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) या योजनेची शिफारस केली होती. तथापि, ती व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त झाल्याने सरकारने ती बासनात गुंडाळल्याचे सांगण्यात येते. रोख व्यवहारांवर सरसकट बंदी घालण्याऐवजी सरकारने जमीन जुमल्याच्या खरेदी-विक्रीत रोखीच्या व्यवहारांवर मर्यादा आणली आहे.काळ्या पैशावर उपाययोजना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने ३ लाखांवरील रोखीचे व्यवहार सरसकट बंद करण्याची शिफारस केली होती. एसआयटीची शिफारस विचारार्थ केंद्रीय थेट कर बोर्डासमोर गेली होती. बोर्डाने या शिफारशीच्या विरोधात मत दिले. रोख व्यवहारांवर बंदी घातल्यास व्यावसायिक आणि कंपन्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर प्रचंड परिणाम होईल, असे बोर्डाने म्हटले.सध्याच्या नियमानुसार एक लाखांवरील रकमेचा कोणत्याही प्रकारच्या भरण्याची माहिती बँकांकडून आयकर विभागाला पॅन क्रमांकासह आपोआप कळते. त्यामुळे बंदीची गरज नाही, असेही बोर्डाने म्हटले होते. बोर्डाने अनेक पातळ्यांवर याबाबत चर्चा केली. कुठूनच बंदीला समर्थन मिळाले नाही. एसआयटीच्या अनेक शिफारशी यापूर्वी स्वीकारल्या गेल्या आहेत. तथापि, रोख व्यवहार बंदीला सरकारकडून अनुकूलता मिळेनाशी झाली आहे. आता वित्तमंत्री अरुण जेटली स्वत: पंतप्रधान कार्यालयाशी सल्ला-मसलत करून याबाबतचा निर्णय घेणार आहेत.>काळा पैशांवरील कर कमी करण्यास नकाररोख व्यवहार बंदी बारगळल्यात जमा असतानाच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेला करदात्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना ३0 सप्टेंबर रोजी संपत आहे. या योजनेत जाहीर केलेल्या काळ्या पैशावर ४५ टक्के कर आकारला जाणार आहे. तो खूपच जास्त असल्याने योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. ३५ ते ३७ टक्क्यांपर्यंत कर लावण्याची सूचना सरकारकडे करण्यात आली होती. तथापि, ती सरकारने फेटाळून लावल्याचेही बोलले जात आहे.