थांबा असूनही बस थांबत नाही

By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30

म्हैसगाववासीयांचा खोळंबा : विभागीय नियंत्रकाच्या आदेशाला केराची टोपली

The bus does not stop even when it's stopped | थांबा असूनही बस थांबत नाही

थांबा असूनही बस थांबत नाही

हैसगाववासीयांचा खोळंबा : विभागीय नियंत्रकाच्या आदेशाला केराची टोपली
कुर्डूवाडी : कुर्डूवाडी-बार्शी महाराष्ट्र राज्य मार्ग क्रमांक ७७ रोडवर म्हैसगाव थांब्यावर बसेसचा थांबा मंजूर असूनही बसेस थांबत नसल्याने ग्रामस्थांना नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतुकीचा अवलंब करावा लागत आहे. विभाग नियंत्रक सोलापूर यांनी जून २०१५ मध्ये म्हैसगाव येथे जलद बसेस थांबाव्यात, असा आदेशही काढला आहे. मात्र तो आदेश कर्मचारी पाळत नाहीत.
या रोडवरुन दररोज २५ जलद गाड्या जाणार्‍या व येणार्‍या २५ गाड्यांना थांबाही देण्यात आला आहे. तरीही गाड्या थांबत नाहीत. या रोडवर पॅसंेजर गाडी एकही नसल्याने नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. प्रवाशांनाही नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहनांचाच वापर करावा लागत आहे.
कुर्डूवाडी व बार्शी येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पासेसही काढले आहेत. मात्र गाड्याच थांबत नसल्याने त्यांनाही दररोज पैसे खर्च करुन अवैध प्रवासी वाहतुकीनेच प्रवास करावा लागत आहे.
बसेस, जलद, अतिजलद यासह सर्व गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रत्येक आगाराला विभाग नियंत्रक परिवहन महामंडळ सोलापूर यांनी त्वरित सूचना द्याव्यात व प्रवासी चढउतारासाठी त्वरित कर्मचार्‍याची नेमणूक करावी, अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना माढा तालुका यांनी के ली आहे.

Web Title: The bus does not stop even when it's stopped