6 महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत राहाणा-या मुलीचाही आढळला मृतदेह

By Admin | Updated: February 26, 2017 08:12 IST2017-02-26T08:12:42+5:302017-02-26T08:12:42+5:30

एका घरात आई आणि मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, 6 महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत राहात होती मुलगी

The body of a woman who was living with her mother's body was found 6 months ago | 6 महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत राहाणा-या मुलीचाही आढळला मृतदेह

6 महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत राहाणा-या मुलीचाही आढळला मृतदेह

>ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 26 - येथील शाहगंज पोलीस चौकीअंतर्गत अर्जून नगरमधील एका घरात आई आणि मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घराच्या एका खोलीतून एका महिलेच्या हाडांचा सांगाडा मिळाला तर दुस-या खोलीतून तिच्याच मुलीचा मृतदेह. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह मिळालेले आई आणि मुलगी 15 वर्षांपासून त्या घरात भाड्याने राहात होते.  विमला अग्रवाल (70) आणि वीना (55) अशी त्यांची नावं आहेत.  गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून विमला यांना तर अनेक दिवसांपासून वीणाला कोणीही घराबाहेर येताना किंवा जाताना पाहिलं नव्हतं. विमला यांचा मृत्यू आधी झाला होता आणि वीणा आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहात होती अशी चर्चा आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून त्या घरातून दुर्गंध येत होता. हिम्मत करून शेजा-यांनी घराचा दरवाजा उघडला त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.  
 
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून त्यानंतरच या घटनेचं गुढ उकलू शकतं.  मात्र, विमला यांचा मृत्यू 5 ते 6 महिन्यांपूर्वी झाला आणि वीना आईच्या मृतदेहासोबत राहात होती अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

Web Title: The body of a woman who was living with her mother's body was found 6 months ago