शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली निवडणुकीत 'सेल्फी विथ मोदी' कॅम्पेन भाजपाला पडले महागात

By admin | Updated: October 31, 2015 10:27 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान चालवण्यात आलेल्या 'सेल्फी विथ मोदी' हे कॅम्पेन भाजपाला भलतेच महाग पडले असून त्यावर १ कोटींहून अधिक खर्च झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सेल्फी ट्रेंड सर्वत्र लोकप्रिय असून ते देशोदेशींच्या दौ-यादरम्यान तसेच अनेक मोठ्या लोकांसोबतचे आपले 'सेल्फी' वेळोवेळी सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करत असतात. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान चालवण्यात आलेल्या 'सेल्फी विथ मोदी' या कॅम्पेनमुळे मोदी आणि भाजपाला काहीही फायदा न होता उलट नुकसानच अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत विधानसभेत 'आप'समोर भाजपाचा काही टिकाव तर लागला नाहीच आणि 'सेल्फी विथ मोदी' या कॅम्पेनसाठी पक्षाला एक कोटीहून अधिक रुपये खर्चावे लागल्याने तिजोरीतही खडखडाट झाला. एवढ्या महत्वाकांक्षी कॅम्पेनची अशी धूळधाण उडाल्यानेच बिहार निवडणुकीत भाजपाने या कॅम्पेनचा विचारही मनात आणला नाही. दिल्ली निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा अहवाल भाजपाने निवडणूक आयोगासमोर सादर केला असून त्यातूनच ही माहिती उघड झाली आहे. 
यावर्षीच्या सुरूवातीस फेब्रुवारीमध्ये दिल्लीत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी भाजपाने कंबर कसून तयारी केली होती, लोकसभा निवडणुकीदरम्यमान उसळलेल्या मोदी लाटेचा फायदा घेऊन दिल्ली काबीज करण्याचा भाजपाचा मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी 'सेल्फी विथ मोदी' हे कॅम्पेन सुरू केले आणि 'पंतप्रधान मोदींच्या व्हर्च्युअल इमेजसोबत लोकांना सेल्फी काढता यावी यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सेल्फी बूथ बसवण्यात आले होते. मात्र या कॅम्पेनच्या पहिल्याच राऊंडमध्ये भाजपाला तब्बल ८६ लाखांचा खर्च आला आणि कॅम्पेनचे सातही टप्पे पार पडेपर्यंत हा खर्च एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही भाजपाला दिल्लीत अपेक्षित यश न मिळाल्याने बिहार निवडणुकीत अशी चूक न करण्याचा निर्धार करून भाजपाने आपले संपूर्ण लक्ष विकासाच्या मुद्यावर केंद्रित केल्याचे दिसत आहे.