शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही मत द्या; आम्ही मोफत लस देऊ! बिहारसाठी भाजपचे आश्वासन, विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 06:56 IST

कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनाम्यात जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे. भाजप कोरोनावरील लशीचा राजकीय फायदा उठवू पाहत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावरही टीकेच्या सूरातील पोस्टचा पूर आला होता.  

कोरोनावरील लशीचे उत्पादन सुरू झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यातील हे पहिले वचन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सीतारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनीही तमिळनाडूच्या जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. 

राहुल गांधी यांची टि्वटद्वारे टीका -केंद्र सरकारने नुकतीच कोविड लसीबाबत धोरण आखले आहे. तुमच्या राज्यात विधानसभा निवडणुका कधी आहेत, त्यानुसार तुम्हाला कोरोनावरील लस कधी मिळेल, हे तुम्हाला समजेल, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्राला लक्ष्य केले. 

बिगरभाजपशासित राज्यांचे काय? ज्या भारतीयांनी भाजपला मतदान केले नाही, त्यांनी कोरोनावरील मोफत लस मिळणार नाही का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

तुम मुझे व्होट दो मै तुम्हे व्हॅक्सिन दुंगा, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप आपल्या तिजोरीतून लशीचे पैसे देणार आहे का? जर सरकारच्या तिजोरीतून लशीचे पैसे दिले जाणार असतील तर फक्त बिहारलाच मोफत लस का?असा सवाल त्यांनी केला.

भाजपचे प्रत्युत्तर -भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी विरोधकांना उत्तर देत म्हटले की, ही लस विकायची की मोफत द्यायची हे त्या त्या राज्यने ठरवायचे आहे. आरोग्य हा राज्याचा मुद्दा असल्याने बिहार भाजपने लस मोफत देण्याचे वचन दिले आहे.

७ अब्ज डॉलर्स लागणार -देशातील १३० कोटी जनतेला कोविड लस देण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ७ अब्ज डॉलर्सची ( अंदाजे ५१ हजार कोटी रुपये) तरतूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रतिव्यक्ती साधारणतः ४५० ते ५५० रुपये खर्च मोदी सरकारने गृहित धरला आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूरRahul Gandhiराहुल गांधी