शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 22:02 IST

या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील.

BJP Review in Uttar Pradesh : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला(BJP) स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही, पण मित्रपक्षांच्या मदतीने केंद्रात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) सरकार स्थापन झाले. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात भाजपला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यूपीमध्ये लोकसभेच्या 80 जागांपैकी पक्षाला केवळ 33 जागा जिंकता आल्या. राज्यात भाजपला इतकी कमी मते का मिळाली, यासाठी पक्षाने आढावा बैठका सुरू केल्या आहेत.

यूपीमध्ये 40 टीम आढावा बैठक घेत आहेतमीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील भाजपच्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी पक्षाने 40 टीम तयार केल्या आहेत. या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील. विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या रिव्ह्यूमध्ये एक पॅटर्न सापडला आहे. पूर्व यूपीपासून पश्चिम यूपीपर्यंत एका विशिष्ट पॅटर्नमध्ये भाजपची मते कमी झाली आहेत.

25 जूनला अहवाल जाहीर करणारयूपीमधील भाजपचा आढावा अहवाल 25 जूनपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. राज्यातील भाजपच्या मतांमध्ये सरासरी 6 ते 7 टक्के मतांची घट झाल्याचे दिसून आले. यूपी भाजपचे अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांना अयोध्या आणि अमेठी लोकसभा जागांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर पक्षाचे इतर वरिष्ठ नेते राज्यातील उर्वरित जागांचा आढावा घेत आहेत.

यूपीमध्ये सपा-काँग्रेसची जादू चाललीगेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जोरदार कामगिरी केली होती, त्यामुळे पक्षाने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला होता. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या जोडीने चमत्कार घडवला. यावेळी सपा आणि काँग्रेसने मिळून राज्यातील 80 लोकसभेच्या 42 जागा जिंकल्या. यापैकी सपाला 37 तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. विशेषत: पूर्व उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी अत्यंत खराब होती. केंद्रीय मंत्र्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा राज्यात पराभव झाला.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा