शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदाराने भडकवली सहारनपूर दंगल - चौकशी आयोग

By admin | Updated: August 17, 2014 13:27 IST

उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथे दोन अल्पसंख्यांक समुदायामध्ये झालेली दंगल भडकवण्यामागे भाजप खासदाराचा हात होता असा आरोप दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. १७ - उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथील दंगल भडकवण्यामागे भाजप खासदाराचा हात होता असा आरोप दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने केला आहे. स्थानिक प्रशासन यंत्रणा दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही या आयोगाने ठेवला आहे. 
गेल्या महिन्यात जमिनीच्या वादातून सहारनपूर येथील दोन समुदायांमध्ये दंगल झाली होती. या दंगलीत तिघांचा मृत्यू झाला होता तर सुमारे २० जण जखमी झाले होते. या दंगलीच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पाच सदस्यीय चौकशी आयोग नेमले होते. यात ग्रामविकास मंत्री अरविंद सिंह गोप, शिक्षणमंत्री शिवाकांत ओझा, युवा कल्याण परिषदेचे उपाध्यक्ष आशू मलिक आणि मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी इकराम कुरैशी यांचा समावेश होता. या आयोगाने १५ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सोपवला आहे. या अहवालात आयोगाने भाजप खासदारावर दंगल भडकवल्याचा आरोप केल्याने गदारोळ निर्माण झाला आहे. या अहवालाविषयी माहिती देताना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव नरेश अग्रवाल म्हणाले, ही दंगल जिल्ह्यातील प्रशासकीय अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे घडली. दंगलीच्या आदल्या रात्री प्रशासनाने वादग्रस्त जमिनीवर बांधकामाची परवानगी दिली. प्रत्यक्षात प्रशासकीय अधिका-यांनी ही परवानगी द्यायला नको होती. तसेच वादग्रस्त ठिकाणी लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवणे अपेक्षीत होते. मात्र प्रशासन यातही अपयशी ठरले असे अग्रवाल यांनी सांगितले. 
भाजपचे खासदार राघव लखनपाल यांनी दंगल भडकवल्याचे आयोगाने अहवालात म्हटले आहे.लखनपाल दंगलग्रस्त भागातील गल्लीबोळ्यात फिरुन दंगल करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देत होते असा गंभीर आरोप अहवालात करण्यात आला आहे. या आयोगाने सहारनपूरमधील लोकांशी आणि प्रशासकीय अधिका-यांची भेट घेऊन हा अहवाल तयार केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. खासदार राघव लखनपाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. 
--------------
पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी 
भाजप दुधाने धुतलेला पक्ष नाही. पंतप्रधान मोदींनी लालकिल्ल्यावरील भाषणात १० वर्षांसाठी जातीय हिंसाचार थांबवा असे आवाहन केले. मात्र स्वतःच्या पक्षातील जातीयवादी शक्तींना ते रोखू शकले नाही. पंतप्रधानांची ही दुटप्पी भूमिका असून यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे - नरेश अग्रवाल, समाजवादी पक्षाचे नेते
--------------
भाजपला गोवले जात आहे
सहारनपूर दंगलीच्या अहवालात भाजप खासदाराला गोवले जात आहे. उत्तरप्रदेशमधील पोटनिवडणुकीच्या तोंडावर धर्माच्या आधारे मताचे विभाजन करण्यासाठी सत्ताधा-यांनी अहवालात भाजप खासदाराचे नाव गोवले आहे. अहवालात प्रशासकीय यंत्रणांचे अपयश म्हटले आहे. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार असून यामुळे तेदेखील प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते  - भाजप 
--------------
अहवाल धूळफेक करणारा 
उत्तरप्रदेश सरकारने सहारनपूर दंगलीप्रकरणी दिलेला अहवाल हा डोळ्यात धूळफेक करणारा अहवाल आहे. भाजप आणि समाजवादी पक्ष हे दोन्ही पक्ष दंगलीसाठी जबाबदार आहेत - मायावती, बसपा अध्यक्ष