'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:11 IST2019-12-24T12:41:25+5:302019-12-24T13:11:21+5:30

बातम्या आणि व्हॅाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून धमकावल्याचे ऐकलं असेल.

BJP MLA Leela Ram Gurjar Says New India belongs to Narendra Modi And Amit Shah | 'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

'नवीन भारत नरेंद्र मोदी, अमित शहांचा'; भाजपा आमदारांची स्तुतीसुमनं

नवी दिल्ली: एनआरसी आणि सीएए कायद्यावरून देशभरात हिंसाचार उफाळलेला असताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलाना देवांसोबत केली होती. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील मुस्लिमांना वगळता अत्याचार केलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याच्या उद्देशाने देशात नागरिकत्व विधेयक कायदा लागू केल्याने त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी देवा पेक्षा कमी नसल्याचे मत शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं होतं. त्यातच आता नवीन भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा असल्याचे विधान हरियाणामधील भाजपाचे आमदार लीला राम गुर्जर यांनी केले आहे.

लीला राम गुर्जर हरियाणातील सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेत म्हणले की,  हा नवीन भारत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा नाही. तर हा भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा असल्याचे विधान केलं आहे. त्याचप्रमाणे बातम्या आणि व्हॅाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून धमकावल्याचे ऐकलं असेल. मात्र आता हा भारत नरेंद्र मोदी यांचा असल्याने आम्हाला आदेश मिळाल्यास एका तासात धमाकवणाऱ्यांचे तोंड बंद केले जाईल असं देखील लीला राम गुर्जर यांनी प्रचारसभेत म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेस, अर्बन नक्षली अफवा पसवत आहेत, असा आरोप नरेंद्र मोदींनी होता. तसेच तरुणांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा असं आवहन केलं होतं. देशाला उद्धवस्त करण्यासाठी विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे, या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: BJP MLA Leela Ram Gurjar Says New India belongs to Narendra Modi And Amit Shah